Pune Rain Update: पुण्यात रेकॅार्डब्रेक पाऊस, ३४ वर्षाचा रेकॉर्ड मोडला

232
Pune Rain Update: पुण्यात रेकॅार्डब्रेक पाऊस, ३४ वर्षाचा रेकॉर्ड मोडला
Pune Rain Update: पुण्यात रेकॅार्डब्रेक पाऊस, ३४ वर्षाचा रेकॉर्ड मोडला

पुणे शहरासह (Pune Rain Update) जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या पावसाने गेल्या 34 वर्षांतील सर्व विक्रम मोडले. पुण्यात दोन दिवसापासून पावसाने झोडपले आहे. संपूर्ण शहरात धुवाँधार पाऊस पडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मागील नऊ दिवसांत 209 मिमीपावसाची नोंद झाली आहे. या पूर्वी जून 2019 मध्ये 74 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. तर 8 जून 2024 लोहगावात 139.8 तर शिवाजीनगरात 117 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात इंदापूरमध्ये 110 मि.मी. पावसाची नोंद झाली. (Pune Rain Update)

झाडं पडल्याच्या एकूण 55 घटना

पुणे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने दुकानदारांच लाखो रुपयांचं नुकसान झाले. तर लोहगाव वाघोली रोड परिसरात काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडीही झाली होती. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अप्पर ओटा परिसरातील झाड कोसळलं. या घटनेत एका व्यक्तीच्या मृत्यू झाला. तर विविध भागातून झाडं पडल्याच्या एकूण 55 घटना घडल्या आहेत. पाणी साचल्याच्या 22 आणि भिंत पडल्याच्या एका घटनेची नोंद झाली आहे. (Pune Rain Update)

पुण्याला आज ऑरेंज अलर्ट

पहिल्याच पावसात पुणे पूर्णपणे तुंबले होते. यामुळे लोकांच्या मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. मागच्या वर्षी शहरासह जिल्ह्यात नियोजित वेळेपेक्षा तब्बल 10 ते 15 दिवस उशीरा आला होता. दरवर्षी शहरात तो 9 ते 10 जून दरम्यान येतो. मागच्या वर्षी 25 जून रोजी शहरात दाखल झाला होता. पुण्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आजही मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, धारशिवसह कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. (Pune Rain Update)

24 तासांत जिल्ह्यात झालेला पाऊस

शिवाजीनगर : 119.1 मिमी
इंदापूर : 110 मिमी
वडगावशेरी : 92.5 मिमी
पाषाण 79.3 मिमी
एनडीए: 71.5 मिमी
तळेगाव ढमढेरे : 60 मिमी
हवेली : 54.5 मिमी
बारामती 51.20 मिमी
हडपसर 45 मिमी
मगरपट्टा : 43 मिमी
दौंड : 35.5 मिमी
चिंचवड : 25.5 मिमी
गिरीवन :21 मिमी
लोणावळा : 12 मिमी
तळेगाव : 11.58 मिमी
राजगुरुनगर : 11 मिमी

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.