T20 World Cup 2024 : सुरतच्या एका कंपनीने प्लास्टिक कचऱ्यापासून बनवले २० संघांच्या राष्ट्रध्वजाचे कोलाज

139
T20 World Cup 2024 : सुरतच्या एका कंपनीने प्लास्टिक कचऱ्यापासून बनवले २० संघांच्या राष्ट्रध्वजाचे कोलाज
T20 World Cup 2024 : सुरतच्या एका कंपनीने प्लास्टिक कचऱ्यापासून बनवले २० संघांच्या राष्ट्रध्वजाचे कोलाज

ऋजुता लुकतुके

सुरतमधील प्रवीण ओव्हरसीज्‌ (Praveen Overseas) या कंपनीने टी-२० विश्वचषक (T20 World Cup 2024) खेळणाऱ्या २० संघांचे राष्ट्रध्वज तयार केले आहेत. हे ध्वज कंपनीने प्लास्टिक कचऱ्यापासून बनवले आहेत. ध्वजाचा आकारही ३५ मीटर बाय २० मीटर इतका आहे. त्यामुळे हे जगातील सगळ्यात मोठे राष्ट्रध्वज असावेत अशा अंदज आहे. कंपनीचे मालक प्रवीण गुप्ता (Praveen Gupta) यांनी या ध्वजांच्या निर्मितीमागची संकल्पना समजावून सांगितली. ‘टी-२० विश्वचषकात (T20 World Cup 2024) सहभागी झालेल्या २० देशांचे हे राष्ट्रध्वज आहेत. ते बनवण्यासाठी पॉलिएस्टर आणि प्लास्टिक कचऱ्यापासून बनवलेले रेयॉन धागे वापरण्यात आले आहेत. भारत शाश्वत ऊर्जेच्या वापरासाठी कटीबद्ध आहे, असं आम्हाला यातून सुचवायचं आहे,’ असं गुप्ता मीडियाशी बोलताना म्हणाले.  (T20 World Cup 2024)

(हेही वाचा- Mumbai-Ahmedabad bullet train च्या कामाने पकडली गती!)

या स्पर्धेसाठी २० देशांचे असे २० राष्ट्रध्वज बनवण्यात आले आहेत. प्रत्येक राष्ट्रध्वजासाठी ५०० मीटर कापड वापरण्यात आल आहे. आणि त्याचं वजन प्रत्येकी १५० किलो आहे. त्यामुळे सर्व ध्वजांचं वजन मिळून ३,५०० किलो इतकं आहे. एकूण ६०० कर्मचाऱ्यांनी २४ तासांत हे काम पूर्ण केलं. ३५ बाय २० मीटर आकाराचे हे ध्वज असल्यामुळे एक ध्वज उंचावण्यासाठी ५४ माणसं लागतात. शाश्वत ऊर्जेच्या प्रसारासाठी हे ध्वज बनवण्यात आले असून ते त्या त्या देशांना भेट देण्यात येणार आहेत.  (T20 World Cup 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.