मुंबई महापालिका तिसऱ्या लाटेसाठी सज्ज होत असतानाच, आता दुसऱ्या लाटेतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शून्याच्या दिशेन पुढे सरकताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून दीड हजारांच्या आसपास असलेली रुग्ण संख्या आता पुन्हा निम्म्यावर आली आहे. त्यामुळे मंगळवारी ही रुग्णसंख्या ८३१ रुग्ण आढळून आले आहेत, तर दिवसभरात २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अशी आहे आकडेवारी
सोमवारी मुंबईत दिवसभरात जिथे ६७६ रुग्ण आढळून आले होते, तिथे मंगळवारी दिवसभरात ८३१ रुग्ण आढळून आले. सोमवारी दिवसभरात १७ हजार ३३८ कोविड चाचण्या करण्यात आल्या होत्या, तर मंगळवारी दिवसभरात २३ हजार ५०३ चाचण्या करण्यात आल्या. ५ हजार ८३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, मंगळवारपर्यंत विविध रुग्णालयांमध्ये १७ हजार ३२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी जिथे २९ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे मंगळवारी २३ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये १७ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे आहेत. यामध्ये १४ पुरुष आणि ९ महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये ४० वर्षांखाली एका रुग्णाचा समावेश असून, ६० वर्षांवरील ११ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या ११ एवढी आहे.
#CoronavirusUpdates
१ जून, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – ८३१
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ५८६८
बरे झालेले एकूण रुग्ण – ६७२६६४
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९५%एकूण सक्रिय रुग्ण- १७३२८
दुप्पटीचा दर- ४५३ दिवस
कोविड वाढीचा दर ( २५ मे ते ३१ मे)- ०.१५ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 1, 2021
मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ४५३ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत १५३ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून, झोपडपट्टी व चाळींची संख्या ही ३५ एवढी आहे.
Join Our WhatsApp Community