लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी (Modi 3.0) यांनी रविवारी (9 जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत घेतली. यावेळी एनडीमधील पक्षाच्या जवळपास ७० खासदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधीचा सोहळा पार पडल्यानंतर आज नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला. (Modi 3.0)
(हेही वाचा –Ravneet Singh Bittu : बैठकीची वेळ गाठण्यासाठी जेव्हा भाजपा नेते रस्त्यावर धावू लागतात…)
पीएम किसान योजनेच्या (PM-Kisan Yojana) १७ व्या हफ्त्याच्या फाईलवर नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार कोटी रुपये जमा होणार आहेत. केंद्रात एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारचा शेतकऱ्यांसाठी हा निर्णय पहिला घेतला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे देशातील तब्बल ९.३ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामध्ये १७ व्या हप्त्यामध्ये सुमारे २० हजार कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून २ हजार रुपयांचा हा हप्ता कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Modi 3.0)
(हेही वाचा –Bus Terror Attack : जम्मूत यात्रेकरुंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात!)
पीएम किसान योजनेच्या माध्यमातून लाभधारक शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2 हजार रुपये दिले जातात. अर्थात एका वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. ही योजना २४ फेब्रुवारी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरु करण्यात आलेली आहे. अद्याप ही योजना सुरु असून आता एनडीए सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर पहिला निर्णय हा पीएम किसान योजनेसंदर्भात घेत शेतकऱ्यांना १७ वा हप्ता मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून २ हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. (Modi 3.0)
(हेही वाचा –Bandra Terminus : वांद्रे टर्मिनस येथे कोणकोणत्या सुविधा तुम्हाला प्राप्त होऊ शकतात?)
आत्तापर्यंत पीएम-किसान योजनेचे १६ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. यामध्ये पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता मिळालेल्या ९.०३ कोटी शेतकऱ्यांपैकी सर्वाधिक २.०३ कोटी उत्तर प्रदेशातील आहेत. तर महाराष्ट्र ८९.६६ लाख, मध्य प्रदेश ७९.९.३ लाख, बिहार ७५.७९ लाख आणि राजस्थान ६२.६६ लाख होते. (Modi 3.0)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community