Modi Cabinet : कुणाला मिळणार कुठलं खातं? उत्सुकता शिगेला

236
Modi Cabinet : कुणाला मिळणार कुठलं खातं? उत्सुकता शिगेला

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत ७१ मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यापैकी ११ मित्रपक्षांचे आहेत. शपथ घेतल्यानंतर पीएम मोदींनी (PM Narendra Modi) सोमवारी पंतप्रधान कार्यालयात पोहोचून पदभार स्वीकारला. त्यांनी सर्वप्रथम किसान सन्मान निधीच्या फाइलवर सही केली. पंतप्रधान कार्यालयात पोहोचल्यावर कर्मचाऱ्यांनी मोदींचे स्वागत केले. मंत्रिमंडळाची पहिली बैठक सोमवारी (१० जून) सायंकाळी ५ वाजता पंतप्रधान निवासस्थान, लोककल्याण मार्गावर होणार असून त्यानंतर रात्रीचे जेवण होईल. (Modi Cabinet)

बैठकीत मंत्र्यांना त्यांच्या खात्यांचे वाटप केले जाऊ शकते. सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या रोड मॅपवरही चर्चा होणार आहे. अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्या खात्यांमध्ये बदल होणार नसल्याचे मानले जात आहे. पूर्वीप्रमाणेच शाह गृहमंत्री आणि राजनाथ संरक्षण मंत्री राहतील. आघाडीत समाविष्ट तेलगू देसम पार्टी (टीडीपी) आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) यांच्या मंत्रिपदांवर सर्वांच्या नजरा असतील. (Modi Cabinet)

(हेही वाचा – T20 World Cup, Ind vs Pak : पाकच्या पराभवानंतर देशातले जाणकार बाबर आझमवर भडकले)

याशिवाय मंत्रिमंडळात समावेश असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांनाही महत्त्वाची खाती मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात ३२ खासदार आहेत जे पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री झाले आहेत, यामध्ये माजी खासदार सीएम शिवराज सिंह चौहान, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि राष्ट्रीय लोक दल प्रमुख जयंत चौधरी यांचा समावेश आहे. (Modi Cabinet)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.