नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ८ जून रोजी तिसऱ्यांदा राजधानी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात पंतप्रधान (PM Oath) पदाची शपथ घेतली. मात्र, महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. उबाठा गट (UBT Group) आणि शिवसेना एकत्र याव्यात अशा शिवसैनिकांच्या भावना आहे. ज्याला मंत्रिपद नको, आमदारकी, खासदारकी नको. कुठलेही पद नको त्या शिवसैनिकांनी दिल्लीमध्ये बॅनर लावले आहेत. खर तर त्यांचा सन्मान केला पाहिजे. आम्हाला मूळात उठाव करायचाच नव्हता असं सांगत शिवसेना नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राजधानी दिल्लीत काही शिवसैनिकांनी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही शिवसेनेला एकत्रित येण्याचं आवाहन केले आहे त्यावर भाष्य केले. (Sanjay Shirsat)
(हेही वाचा – Modi Cabinet : कुणाला मिळणार कुठलं खातं? उत्सुकता शिगेला)
यावर संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले की, ज्यांनी बॅनर लावलेत त्यांना शिवसेनाप्रमुखांची शिवसेना हवी. आम्ही उठाव केला तर काही लोकांनी गद्दारी केली. शिवसेना प्रमुखांचे विचार पायदळी तुडवले आणि काँग्रेस सोबत आघाडी केली. हे लोकांना आवडलं नाही. त्यामुळे दोन्ही शिवसेना शिवसेनाप्रमुखांच्या विचाराने पुढे जावेत ही त्या शिवसैनिकांची भावना आहे. त्याचा आम्हा सन्मान करतो. आम्हाला मूळात उठाव करायचाच नव्हता असं संजय शिरसाट यांनी यांनी सांगितले.
(हेही वाचा – Suresh Gopi : भाजपाच्या केरळमधील खासदाराने वाढवली चिंता; काल शपथ, आता म्हणतात, मला पदमुक्त करा…)
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळासाठी आमची कुठलीही मागणी नव्हती. जे मिळालं ते घेतले. मात्र इतरांच्या पोटात दुखण्याचं कारण काय? आम्हाला दुसऱ्याचं वाकून पाहण्याची गरज नाही. तुम्हाला काय करायचं आहे. तुम्ही सत्तेबाहेर आहात, उगाच चर्चा घडवायची. बघा इतकं असून यांना काही मिळालं नाही. त्यामुळे आमचं आम्ही पाहू. तुमचं तुम्ही पाहा असा टोला शिवसेनेने उबाठा गटाला लगावला आहे. (Sanjay Shirsat
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community