Uddhav Thackeray : विधानसभा समोर ठेवून कामाला लागा

209
बाळासाहेबांच्या स्मारकाचे लोकार्पण लवकरच; Uddhav Thackeray यांची माहिती

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोमवारी (१० जून) आपल्या सर्व आमदार आणि नवनिर्वाचित खासदारांची सेना भवनात बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारी या बैठकीमध्ये चर्चा झाली. उबाठा गटाकडून विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. (Uddhav Thackeray)

(हेही वाचा – Manipurमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा पथकावर दहशतवादी हल्ला)

१८० जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करा…

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरु करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, जागावाटपाची चिंता करु नका. राज्यात महाविकास आघाडी मजबूत व्हावी यासाठी काम करा, अशा महत्त्वाच्या सूचना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैठकीत दिल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी सोमवारच्या बैठकीत आपलं लक्ष्य कार्यकर्त्यांसमोर मांडलं आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहे. यापैकी १८० जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावेत, यासाठी काम करण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या. (Uddhav Thackeray)

‘विधानसभा निवडणुकीसाठी जोमात कामाला लागा’ अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी आमदार-खासदारांना दिल्या आहेत. लोकसकभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या वतीने आता विधानसभा निवणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी बैठकांचे सत्र सुरू करण्यात आले आहे. मुंबईत नव्याने निवडून आलेल्या सर्व खासदारांसह आमदार आणि प्रमुख नेत्यांची बैठक उद्धव ठाकरे यांनी घेतली. या बैठकीमध्ये ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी जोमात कामाला लागा अशा सूचना दिल्या आहेत. (Uddhav Thackeray)

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या चुका पुन्हा होणार नाही आणि विधानसभेला आपण पुन्हा जोमाने प्रचार करू असे देखील उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे राज्यभर दौरा करणारच असल्याचे देखील त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. (Uddhav Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.