मुंबई महापालिका मुख्यालयातील जुन्या इमारतींमधील फॉल सीलिंगचा भाग कोसळण्याचे प्रकार सुरुच असूनही काही दिवसांपूर्वी तळ मजल्यावरील लेखा विभागातील प्लास्टर ऑफ पॅरिसरच्या शिटचे फॉल सीलिंग कोसळल्यानंतर अशीच घटना याच इमारतीतील पहिल्या मजल्यावर घडली. पहिल्या मजल्यावरील विरोधी पक्षनेते यांच्या कार्यालयातील फॉल सीलिंगच्या छताचा भागच रविवारी रात्री कोसळला. रात्रीच्या वेळेत ही घटना घडल्याने कोणालाही हानी पोहोचली नसली तरी वारंवारच्या या घटनांमुळे या इमारतीतील कार्यरत विविध विभागांमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (BMC Head Office)
महापालिका मुख्यालयातील जुन्या हेरिटेज इमारतीचे नुतनीकरणाचे काम सुरु असून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पहिल्या मजल्यावरील कार्यालयातील नळ सुरु ठेवल्याने पाणी जमा होऊन हे पाणी तळ मजल्यावरील भागात झिरपले गेले. त्यामुळे तळ मजल्यावरील फॉल सीलिंगचा भाग ओला होऊन कोसळला गेला. विशेष म्हणजे कर्मचारी निवडणूक कामात असताना तसेच ही घटना रात्रीच्या वेळेत घडल्याने मंगळवारी कामावर परतल्यानंतर या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनासही ही बाब आली होती. (BMC Head Office)
(हेही वाचा – Mumbai Rain : पहिल्या पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याची समस्या यंदाही कायमच)
मात्र, या घटनेनंतर सोमवारी सकाळी महापालिकेच्या विरोधी पक्षनेते यांच्या कार्यालयातील कार्यरत कर्मचारी कामावर रुजू झाल्यानंतर त्यांच्या निदर्शनासही बाब दिसून आली. विरोधी पक्षनेते यांच्या कार्यालयाची ही जागा असून वरील बाजुस असलेल्या फॉल सीलिंगसह सीलिंगचा भागही कोसळला गेला आहे. या कार्यालयाच्या वरील मजल्यावर बाथरुम असल्याने तेथील नळ खुले राहिल्याने तथा त्यातून पाण्याची गळती झाल्याने या भागात पाणी झिरपले गेले. या वारंवारच्या गळतीमुळे छताच्या सिमेंट काँक्रिटचा भाग फॉल सीलिंगवर पडल्याने वजनामुळे हा भाग कोसळला गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वारंवारच्या या दुर्घटनांमुळे महापालिकेचे कर्मचारी आता भीतीच्या छायेखाली काम करत असल्याचे दिसून येत आहे. (BMC Head Office)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community