Malanggad Landslide : मलंगगडावर दरड कोसळल्याने एकाचा मृत्यू; प्रशासनाने वेधले अनधिकृत वस्तीकडे लक्ष

Malanggad Landslide : सकाळी ६ च्या सुमारास श्री मलंगगडाच्या उंच शिखरावरून दरड कोसळून खाली आली. निखळून आलेले मोठं मोठे दगड पायथ्याशी असलेल्या घरावर कोसळले.

167
Malanggad Landslide: मलंगगडावर दरड कोसळल्याने एकाचा मृत्यू; प्रशासनाने वेधले अनधिकृत वस्तीकडे लक्ष
Malanggad Landslide: मलंगगडावर दरड कोसळल्याने एकाचा मृत्यू; प्रशासनाने वेधले अनधिकृत वस्तीकडे लक्ष

रात्रीच्या अंधारात घडलेल्या इर्शाळवाडी आणि माळीण यांसारख्या दुर्घटना महाराष्ट्र विसरलेला नाही. अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर (Malanggad) सकाळच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. येथे इर्शाळवाडीची (Irshalwadi landslide) पुनरावृत्ती होता होता राहिली.

(हेही वाचा – Pune Porsche Accident : नरेंद्र दाभोलकरांच्या शवविच्छेदनावेळी पुरावे गायब केल्याचा Dr. Ajay Taware वर संशय )

ठाणे जिल्ह्यातील मलंगगड परिसरात रात्रीपासूनच पावसाने जोर धरला आहे. आज सकाळी ६ च्या सुमारास श्री मलंगगडाच्या उंच शिखरावरून दरड कोसळून खाली आली. निखळून आलेले मोठं मोठे दगड पायथ्याशी असलेल्या घरावर कोसळले. दरड कोसळण्याचा आवाज होताच दोन्ही पती पत्नीने आपल्या एक वर्षाच्या मुलाला कवटाळून धरले. बाळाला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी दगडांचे घाव स्वतःवर घेतले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. गुलाम सैय्यद असे मृताचे नाव आहे. एक वर्षाच्या मुलाला किरकोळ दुखापत झाली आहे.

मलंगगडावर जवळपास चारशे पाचशे कुटुंबाची लोकवस्ती आहे. आमच्या जीविताला धोका असून गडावरच सुरक्षित ठिकाणी आमचे पुनर्वसन करून द्यावे, अशी स्थानिक रहिवाश्यांसह मृतकाच्या वडिलांनी मागणी केली आहे.

प्रशासन म्हणते वसाहत अनधिकृत 

या भागात दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडतात, तरीही नागरिक आपला जीव धोक्यात घालून याठिकाणी राहतात, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून डोंगर भागात वाढत असलेल्या अनधिकृत वसाहतीचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.