-
सचिन धानजी,मुंबई
रेल्वे मार्गावरील ओवर हेड वायर यांना अडथळा ठरणाऱ्या रुळा लगतच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी (Railway line Tree Cutting) रेल्वे प्रशासनाकडून केली जात असताना यंदा ही छाटणी महापालिकेच्या तिजोरीतून केली जात आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गालगत ५२ ठिकाणे मिळून एकूण २ हजार ४२४ झाडांची छाटणी करणे गरजेचे असून त्यातील ७० ते ८० टक्क्यांहून अधिक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. मात्र, एका बाजुला महापालिकेकडून मोफत झाडांच्या फांद्यांची छाटणी करून घेतानाच दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने या झाडांची छाटणी करण्यासाठी संस्थेची नियुक्ती करण्यासाठी निविदा मागवली आहे. त्यामुळे या झाडांच्या छाटणीचे पैसे महापालिकेचा न देता संस्थेची नेमणूक करून त्यांच्या माध्यमातून ही छाटणी काम दाखवून रेल्वेचा पैसा लुटण्याचा डाव असल्याचे दिसून येत आहे. (Railway line Tree Cutting)
रेल्वे हद्दीतील विशेषता रेल्वे मार्गालगत पावसाळ्यात झाडांच्या फांद्या पडून किंवा झाडे उन्मय रेल्वे मार्ग विस्कळीत होऊ नये म्हणून दरवर्षी रेल्वे प्रशासनाच्या वतीने महापालिकेची परवानगी घेऊ झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाते त्यामुळे आजवर रेल्वे प्रशासन स्वखर्चाने रेल्वे रुळालगतच्या भागातील झाडांची छाटणी करत असतानाच आता ही छाटणी महापालिकेच्यावतीन केली जात आहे. या छाटणीसाठी महापालिकेच्या ती तिजोरीतून खर्च करण्यात येत आहेत.
(हेही वाचा – Malanggad Landslide : मलंगगडावर दरड कोसळल्याने एकाचा मृत्यू; प्रशासनाने वेधले अनधिकृत वस्तीकडे लक्ष)
मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने पावसाळापूर्व खबरदारी म्हणून मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांलगत असलेल्या झाडे तथा त्यांच्या फांद्यांच्या छाटणीचे वेगात सुरू केले आहे. सर्वेक्षणानुसार या तीन रेल्वे मार्गालगत २ हजार ४२४ झाडांच्या छाटणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. यातील पश्चिम रेल्वे रुळालगतची ३४, मध्ये रेल्वे लगतची १६ आणि हार्बर रेल्वे मार्गालगतची २ अशा एकूण ५२ ठिकाणच्या झाडांच्या छाटणीसाठी उद्यान विभागाने परवानगी दिली आहे. या ५२ ठिकाणी मिळून असलेल्या एकूण २ हजार ४२४ पैकी ७० ते ८० टक्क्यांहून अधिक झाडांची छाटणी झाली आहे. घाटकोपर, विद्याविहार, वडाळा , विलेपार्ले, परेल, चिंचपोकळी,,माहीम, माटुंगा आदी परिसरातील रेल्वे रुळालगतच्या झाडांची छाटणी सुरू आहे. (Railway line Tree Cutting)
रेल्वे रुळांलगत धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांची छाटणी
पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या अनुषंगाने मध्य, पश्चिम आणि हार्बर उपनगरीय रेल्वे मार्गालगतच्या झाडांची सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटणी करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी महानगरपालिका मुख्यालयात काही दिवसांपूर्वी पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठकप्रसंगी दिले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभाग आणि रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे रुळांलगत धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांची छाटणी करण्यात येत आहे. (Railway line Tree Cutting)
(हेही वाचा – Narendra Modi 3.0: संरक्षण खात्यावरही असणार मोदींची बारीक नजर !)
झाडांच्या छाटणीसाठी रेल्वे प्रशासनाचा खर्च
महापालिकेचे तत्कालिन आयुक्त अजोय मेहता यांनी रेल्वे प्रशासनासह इतर प्राधिकरणांना एक गठ्ठा परवानगी दिली होती आणि त्यानुसार रेल्वे प्रशासन हे रेल्वे हद्दीतील झाडांच्या फांद्यांची छाटणी स्वत:च करत असे. त्यामुळे रेल्वे हद्दीतील झाडांच्या छाटणीसाठी (Railway line Tree Cutting) महापालिकेला कोणताही पैसा खर्च करावा लागत नव्हता. परंतु आता याच रेल्वे हद्दीतील झाडांच्या फांद्यांची छाटणी महापालिकेच्या वतीने केली जात आहे. त्यामुळे ज्या झाडांच्या छाटणीसाठी रेल्वे प्रशासन खर्च करत होते, तोच खर्च आता महापालिकेला करावा लागत आहे.
दरम्यान, रेल्वे रुळालगत झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी महापालिकेच्या वतीने मोफत करून घेतली जात असताना रेल्वे प्रशासनाने तीन जून रोजी निविदेची जाहिरात प्रकाशित करून संस्थेची नेमणूक करण्याच्या निर्णय घेतला आहे या निविदेच्या जाहिरातीमध्ये ‘ रनिंग ट्रॅकच्या मार्गापासून सुरक्षिततेचे उल्लंघन करणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे/ कापणे आदींसाठी संस्थेची नेमणूक करण्याची प्रक्रिया राबवली आहे. यानुसार झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने संस्थेची नेमणूक करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. आतापर्यंत महापालिका प्रशासनाने ज्या झाडांच्या फांद्यांची छाटणी केली आहे, त्याचा एकही पैसा रेल्वेने महापालिकेला अदा केलेला नाही. मात्र एवढ्या उशिरा या कामासाठी संस्थेची नेमणूक करण्याची प्रक्रिया राबवून या नियुक्त करण्यात येणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून ही सर्व कामे दाखवण्याची दाट शक्यता आहे.
रेल्वे हद्दीतील नाले सफाई चे काम करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी देण्यात येतो.आणि हा निधी देण्यात आल्यानंतरच रेल्वे प्रशासन रेल्वे मार्गावरील नाल्यांची तथा नाल्यांवरी मोऱ्या यांची स्वच्छता तथा साफसफाई करत असते. मात्र एका बाजूला महापालिकेकडून नाले सफाई करण्याचे पैसे घ्यायचे आणि दुसरीकडून महापालिके कडून मोफत झाडांची छाटणी करून घ्यायची या प्रकारामुळे रेल्वे प्रशासनाला महापालिका झुकते माप देते असे अधोरेखीत होत आहे. जर नाले सफाई करता महापालिका रेल्वे प्रशासनाला पैसे देते मग वृक्ष छाटणी करण्याची यंत्रणा मुंबई महापालिकेकडे असल्याने रेल्वेने या हद्दीतील छाटणीचा खर्च मुंबई महापालिकेला अदा करणे आवश्यक आहे. मात्र याबाबतची कोणतीही मागणी महापालिका आयुक्तांनी न करता थेट आपल्याच तिजोरीत हात घातल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रेल्वे प्रशासनाल जात फांद्यांची छाटणी करायची होती, तर याची निविदा पावसाळ्यापूर्वीच करून संस्थेची नेमणूक करता आली असती. पण यावर्षी ही प्रक्रिया केली जात असली तरी प्रत्यक्षात या छाटणीचं काम नियुक्त होणाऱ्या संस्थेकडून करता येणे शक्य नाही. त्यामुळे या वर्षात झालेल्या सर्व छाटणीचे पैसे रेल्वेने महापालिकेला देण्यात यावे याबाबतही महापालिकेकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Railway line Tree Cutting)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community