PM Modi Ministries : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कोणत्या खात्यांची जबाबदारी ?

PM Modi Ministries : सोमवार, ११ जून रोजी खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडेही काही मंत्रालये देण्यात आली आहेत.

254
PM Modi Ministries : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कोणत्या खात्यांची जबाबदारी ?
PM Modi Ministries : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कोणत्या खात्यांची जबाबदारी ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह मंत्रीमंडळाने ९ जून रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या वेळी पंतप्रधान मोदींसह 72 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्रीमंडळामध्ये पंतप्रधानांसह 30 कॅबिनेट मंत्री, 36 राज्यमंत्री, 5 स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री यांचा समावेश आहे. सोमवार, ११ जून रोजी खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडेही काही मंत्रालये देण्यात आली आहेत. पंतप्रधानांकडे कोण-कोणत्या खात्याची जबाबदारी आहे, हे जाणून घ्या.

(हेही वाचा – Malanggad Landslide : मलंगगडावर दरड कोसळल्याने एकाचा मृत्यू; प्रशासनाने वेधले अनधिकृत वस्तीकडे लक्ष)

पंतप्रधान मोदींकडे कोणती खाती ?  

नरेंद्र मोदी यांच्याकडे अंतराळ मंत्रालय आणि अणुऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यासोबतच पंतप्रधान मोदींकडे कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन खात्याची जबाबदारीही आहे. त्यामुळे कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालय (Ministry of Personnel, Public Grievances and Pensions), अणुऊर्जा मंत्रालय (Department of Atomic Energy), अंतराळ मंत्रालय (Department of Space)

एकूण खातेवाटप पहाता यंदाच्या खातेवाटपात महत्त्वाच्या खात्यांमध्ये काही बदल करण्यात आलेला नाही. नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक खाते, तर अमित शाहांकडे पुन्हा गृह आणि सरकार खाते देण्यात आले आहे. एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय देण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.