स्वतःची काव्यात्मक शैली निर्माण करणारे चित्रकार Ganesh Pyne

165
स्वतःची काव्यात्मक शैली निर्माण करणारे चित्रकार Ganesh Pyne
स्वतःची काव्यात्मक शैली निर्माण करणारे चित्रकार Ganesh Pyne

गणेश पायने (Ganesh Pyne) हे भारतीय चित्रकार होते. ११ जून १९३७ रोजी कोलकाता येथे त्यांचा जन्म झाला. लहानपणी आजीने सांगितलेल्या गोष्टी ऐकत असतानाच एक काल्पनिक दृष्टी त्यांना लाभली आणि चित्रकार म्हणून त्यांचा प्रवास सुरु झाला. तसेच लहानपणी त्यांनी मौचक हे बंगाली बाल-नियतकालिक वाचले. यामध्ये बंगाल स्कूल आर्ट चळवळीचे संस्थापक अबनींद्रनाथ यांचे छापील रेखाचित्र पाहायला मिळाले.

या चित्रांचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि ते तासनतास आपल्या काळ्या पाटीवर खडूने चित्र काढू लागले. मात्र १९४६ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता आणि पुढे भारताची फाळणी झाली. वयाच्या नवव्या वर्षी त्यांना हे भयाण चित्र पाहावे लागले. पुढे त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट अँड क्राफ्ट येथून शिक्षण घेतले आणि १९५९ मध्ये पदवी प्राप्त केली.

(हेही वाचा – BMC Head Office : महापालिका मुख्यालय इमारतीतील कर्मचारी भीतीच्या छायेखाली, सलग दुसऱ्यांदा सुट्टीच्या दिवशी घटना)

पायने यांनी मंदार मलिक यांच्या स्टुडिओमध्ये पुस्तकाचे चित्रकार आणि चित्रपटांसाठी स्केचिंग करत आपल्या कलात्मक कारकिर्दीला सुरुवात केली. रंग खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे त्यांनी पेन आणि शाईने छोटी रेखाचित्रे काढली. १९६३ मध्ये सोसायटी फॉर कंटेम्पररी आर्टिस्टमध्ये ते सामील झाले, ज्यात बिकाश भट्टाचार्जी, श्यामल दत्ता रे, धर्मनारायण दासगुप्ता आणि गणेश हलोई यांसारखे महान कलाकार यांचा समावेश होता. (Ganesh Pyne)

चित्रकार भूपेन खाखर यांच्या मते, कोवळ्या वयात त्यांनी दुःख भोगले आणि प्रचंड हिंसाचार पाहिला यामुळे त्यांच्या मनावर एक गडद छाया तयार झाली. काळा आणि निळा रंग ते वापरत. त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या चित्रांमुळे त्यांना “अंधकाराचा चित्रकार” म्हणून वेगळी ओळख प्राप्त झाली. मृत्यू, वेदना आणि एकटेपणा हे त्यांच्या चित्रांचे प्रमुख विषय होते.

त्याचबरोबर पायने हे बंगाल स्कूल ऑफ आर्टच्या सर्वात उल्लेखनीय कलाकारांपैकी एक होते. बंगालमध्ये त्यांचं खूप नाव झालं. त्यांनी दुःख दाखवण्यासोबतच बंगाली लोककथा आणि पौराणिक कथांवरही चित्रे रेखाटली आहेत. “काव्यात्मक अतिवास्तववाद” ही एक नवीन शैली त्यांनी विकसित केली होती. पायने यांना केरळ सरकारने राजा रविवर्मा पुरस्कार आणि २०११ मध्ये इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सने जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला आहे. (Ganesh Pyne)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.