Rohan Bopanna : रोहन बोपान्ना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत खेळणार

आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने भारताच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

171
Rohan Bopanna : रोहन बोपान्ना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत खेळणार
Rohan Bopanna : रोहन बोपान्ना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत खेळणार
  • ऋजुता लुकतुके

रोहन बोपान्ना (Rohan Bopanna) सध्या दुहेरीच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. आणि त्या जोरावर आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने त्याच्या ऑलिम्पिक सहभागाला मान्यता दिली आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी १० जून ही क्रमवारी तपासण्याची शेवटची तारीख होती. आणि त्या दिवशी दुहेरीत पहिल्या दहांत असलेले खेळाडू ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरणार होते. त्या निकषात रोहन बोपान्ना (Rohan Bopanna) बसत आहे. इतर खेळाडूंविषयी निकष काय असतील ते मात्र अजून टेनिस संघटनेनं स्पष्ट केलेलं नाही.

‘ऑलिम्पिकसाठीची पात्रता मुदत ३० जूनपर्यंत आहे. त्यामुळे उर्वरित खेळाडूंविषयीचा निर्णय आम्ही जून अखेरपर्यंत घेऊ. आणि ४ जुलैला ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंची नावं जाहीर करू,’ असं आंतरराष्ट्रीय संघटनेनं आपल्या वेबसाईटवर जाहीर केलं आहे. भारताचा सुमित नागल सध्या एकेरीत जागतिक क्रमवारीत ७७ व्या क्रमांकावर आहे. त्या निकषावर त्याचाही ऑलिम्पिक सहभाग जवळ जवळ निश्चित आहे.

(हेही वाचा – T20 World Cup 2024 : ‘बुमराहच भारताला टी२० विश्वचषक जिंकून देऊ शकतो,’ – अनिल कुंबळे)

तर देशांच्या राष्ट्रीय संघटनांनी आपलं नामांकन पाठवण्याची मुदत १९ जूनपर्यंत आहे. त्यापूर्वी भारतीय टेनिस संघटनेनं बैठक बोलावून निवड प्रक्रिया ठरवणं अपेक्षित आहे. बोपान्नाने दुहेरीतील साथीदार म्हणून श्रीराम बालाजीची निवड केली आहे. पण, टेनिस फेडरेशनचे अध्यक्ष अनिल धुपार यांनी निवड समिती यावर अंतिम निर्णय घेईल, असं स्पष्ट केलं आहे. भारतात टेनिस फेडरेशनकडून होणारी नामांकनं ही वादाची ठरली आहेत. खासकरून महेश भूपती आणि लिअँडर पेसच्या काळी दुहेरीतील साथीदारांवरून वाद निर्माण झाले होते.

आताही भारतीय टेनिस फेडरेशनने क्रीडा प्राधिकरणाच्या ‘टारगेट ऑलिम्पिक पोडिअम’ या योजनेत रामकुमार रामनाथनचा समावेश केला आहे. आणि त्यामुळे खेळाडूंच्या निवडीविषयी थोडाफार संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.