Sumit Nagal : सुमित नागलची जागतिक क्रमवारीत ७७ व्या स्थानावर झेप

Sumit Nagal : सुमितने क्रमवारीत १८ स्थानांची झेप घेतली आहे. 

148
Sumit Nagal : सुमित नागलची जागतिक क्रमवारीत ७७ व्या स्थानावर झेप
  • ऋजुता लुकतुके

भारताचा उगवता टेनिसपटू सुमित नागलने (Sumit Nagal) एका आठवड्यात १८ स्थानांची झेप घेत जागतिक क्रमवारीत आता ७७ वं स्थान पटकावलं आहे. हाईलब्रोनर नेकार कप या एटीपी चॅलेंजर स्पर्धेतील विजयामुळे सुमितला ही मुसंडी मारणं शक्य झालं आहे. या स्पर्धेत अंतिम फेरीत त्याने स्वीत्झर्लंडच्या अलेक्झांडर रिश्चार्डचा ६-१, ६-७ आणि ६-३ असा पराभव केला. या वर्षात सुमितने मिळवलेलं हे दुसरं एटीपी चॅलेंजर विजेतेपद आहे. यापूर्वी घरच्या मैदानावर त्याने चेन्नई ओपन स्पर्धा जिंकली होती. (Sumit Nagal)

या विजेतेपदाचा उपयोग सुमितला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागासाठीही होणार आहे. कारण, क्रमवारीच्या निकषावर त्याचा थेट समावेश आता होऊ शकतो. (Sumit Nagal)

(हेही वाचा – T20 World Cup, Ind vs Pak : हरभजनच्या तिखट उत्तरानंतर कामरान अकमलची सपशेल माफी)

गेल्या आठवड्यात चॅलेंजर स्पर्धा जिंकल्यानंतर सुमित नागलने ट्विटरवर आनंद व्यक्त केला होता. ‘या आठवड्यातील विजेतेपदाचा आनंद खूप मोठा आहे. मी कारकीर्दीतलं आतापर्यंतचं सर्वोत्तम टेनिस या आठवड्यात खेळलो आहे. क्रमवारीत याचा फायदा होईलच. पण, ते दुय्यम आहे. पहिलं महत्त्वाचं चांगलं खेळणं,’ असं सुमितने (Sumit Nagal) आपल्या ट्विटर संदेशात लिहलं होतं. २०२३ सालापासून आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये सुमितने चांगली कामगिरी केली आहे. आणि तेव्हापासून पुढील दोन वर्षांत त्याच्या नावावर ४ एटीपी चॅलेंजर विजेतेपदं जमा झाली आहेत. (Sumit Nagal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.