राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या महायुती भूमिकेविरोधी वक्तव्यांमुळे भविष्यात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केवळ विकासाचा अजेंडा घेऊन मते मिळत नाहीत तर मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, अशी अप्रत्यक्ष भूमिका भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात मांडली. या भूमिकेमुळे भाजपा-शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यात शीतयुद्ध सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Mahayuti Tension)
भाजपा-शिवसेना युती ही वैचारिक आणि तत्व यावर आधारीत युती असून राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेला घरोबा ही राजकीय तडजोड असल्याचे भाजपा नेत्यांकडून वेळोवेळी स्पष्ट करण्यात आलेले आहे. (Mahayuti Tension)
मुंबईत सगळे निवडून येतील असे वाटले पण..
भुजबळ यांनी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, “मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर मेट्रो, कोस्टल रोड अशी अनेक विकासकामे सुरू आहेत. लाखों कोटी रुपये आपण खर्च केले. आणि अजूनही करतो आहोत. विकास, विकास, विकास. एवढे काम आपण केले, मला तर वाटले सगळेच लोकसभेला निवडून येतील, पण निवडून किती आले? एक पीयूष गोयल आणि दुसरे रवींद्र वायकर मागे-पुढे, मागे-पुढे करत ४८ मतांनी निवडून आले.” (Mahayuti Tension)
(हेही वाचा – Modi 3.0 : पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळात ५ अल्पसंख्यांकांना संधी)
मुस्लिम दलित सोडून गेले
“पण शेवटी काय? मुस्लिम, दलित, आदिवासी समाज आपल्याला सोडून गेले, ते का गेले? खोटी समजूत करून घेऊन काही होणार नाही. आजार काय झाला आहे ते ओळखून त्यावर औषध काय करायचे ते ठरवले पाहिजे, मग यश आपलं आहे,” असे भुजबळ म्हणाले. (Mahayuti Tension)
मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये
भुजबळ यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत शिवसेना (शिंदे) खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले की, “महायुतीमधील नेत्यांनी वक्तव्य करताना विचार करून, भान ठेऊन वक्तव्य करावं, असं दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया देणे मला उचित वाटत नाही. पण मला एवढंच सांगायचं आहे, महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कुणीही करू नये.” (Mahayuti Tension)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community