Apple OpenAI Partnership : आयफोन, आयपॅडमध्ये मिळणार चॅटजीपीटीची सुविधा

Apple OpenAI Partnership : ग्राहकांना मोफत आणि खातंही न उघडता ॲपल उत्पादनांवर चॅट जीपीटी उपलब्ध होणार आहे.

175
Apple OpenAI Partnership : आयफोन, आयपॅडमध्ये मिळणार चॅटजीपीटीची सुविधा
  • ऋजुता लुकतुके

ॲपल आणि ओपनएआय या आघाडीच्या टेक कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या वाटाघाटींविषयीचा संभ्रम आता संपला आहे. आणि ॲपल कंपनीने त्यांच्या उत्पादनांमध्ये ओपन एआयचा लोकप्रिय ठरलेला चॅटबॉट चॅट जीपीटी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. आयओएस १८, आयपॅड ओएस १८ आणि मॅक ओएस सिक्वोआ या तीन ऑपरेटिंग प्रणाली असलेल्या उत्पादनांमध्ये आता चॅट जीपीटी वापरता येणार आहे. (Apple OpenAI Partnership)

शिवाय हा वापर मोफत असेल आणि त्यासाठी ग्राहकांना नवीन खातंही उघडावं लागणार नाही, असं ॲपलने स्पष्ट केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा वापर सुरक्षित असेल, असंही कंपनीने सांगितलं आहे. म्हणजेच ॲपलचा सिरी हा ब्राऊझर चॅट-जीपीटीसाठी वापरला तर तुमची माहिती आणि तुम्ही केलेला चॅटबॉटचा वापर ही माहिती गोपनीय राहील. ती कुणालाही उघड होणार नाही. तसंच ग्राहकांना चॅट जीपीटीचा वापर करायचा आहे की, नाही हे ग्राहकांना आधी विचारलं जाईल. आणि त्यानंतर सिरी त्याविषयीचा निर्णय घेईल. (Apple OpenAI Partnership)

(हेही वाचा – Pune Rain : पुणे शहरात सर्वाधिक पाऊस, १० दिवसांत किती मिलीमीटर पावसाची नोंद? जाणून घ्या…)

ॲपलमध्ये अंगभूत असलेल्या रायटिंग टूल्स म्हणजे लिखाणासाठी असलेल्या ॲपमध्ये चॅट जीपीटीचा वापर करता येऊ शकेल. तसंच लिखाणाला पूरक छायाचित्र तयार करण्यासाठीही चॅट जीपीटीचा वापर करता येऊ शकेल. या वर्षीच्या अखेरीस आयफोन, आयपॅड आणि मॅकबुकवर चॅट जीपीटीचा जीपीटी ४o हा प्रोग्राम ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. जे आधीपासून चॅट जीपीटीचे सबस्क्रायबर आहेत त्यांना या प्रोग्रामधील अद्ययावत सुविधा मोफत वापरता येतील. (Apple OpenAI Partnership)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.