केंद्र सरकारमधील मंत्रीपदं आणि खाते वाटप झाल्यानंतर आता येत्या २४ जूनपासून लोकसभेचं विशेष अधिवेशन सुरू होत आहे. याच अधिवेशनात लोकसभा अध्यक्षांचीदेखील निवड केली जाणार आहे. इंडिया टुडेनं सुत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. ( Lok Sabha Special Session)
२४ जून ते ३ जुलै या काळात अधिवेशन…
हे विषेश अधिवेशन ८ दिवस चालणार असून २४ आणि २५ जून रोजी नवनिर्वाचित संसद सदस्यांचा शपथविधीदेखील सभागृहात पार पडेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे, पण भाजपाचा या अधिवेशनातील प्रमुख अजेंडा हा एनडीए सरकारच्या लोकसभा अध्यक्ष निवडीचा असेल. २४ जून ते ३ जुलै या काळात हे अधिवेशन चालणार आहे. ( Lok Sabha Special Session)
(हेही वाचा – Loksabha Speaker : लोकसभा अध्यक्ष पदासाठी एनडीए सरकारमधील प्रमुख घटक पक्ष आग्रही)
अध्यक्षपदी कोण?
लोकसभा अध्यक्षपद हे एनडीएतील घटक पक्षांकडं जाईल अशी सध्या चर्चा सुरू आहे. यामध्ये टीडीपी किंवा जेडीयू या पक्षांच्या खासदाराकडं लोकसभा अध्यक्षपद जाईल, अशीदेखील चर्चा सुरू आहे; पण भाजपाला हे पद इतर पक्षांना देण्याची इच्छा नाही. त्यामुळेच लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजपाच्या खासदार डी. पुरंदेश्वरी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. डी पुरंदेश्वरी या भाजपात असल्या तरी टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या मेहुणी आहेत. ( Lok Sabha Special Session)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community