Porsche Accident Pune : किडनी तस्करीतही अडकलेला Dr. Ajay Taware

कोल्हापूरच्या महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिची किडनी काढण्यात आली होती. याप्रकरणी तिने तक्रार दाखल केल्यानंतर आरोग्य विभाग कामाला लागले.

452

कल्याणी नगर अपघात प्रकरणी ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे (Dr. Ajay Taware) याच्या भोवती कायद्याचा फास दिवसागणिक आवळत चालला आहे. कारण अग्रवालच्या ‘बाळा’च्या रक्त चाचणीसाठी घेतलेले सॅम्पल आदला बदल केल्याचा आरोप तावरेवर आहे. कारण त्याने ‘बाळा’चे सॅम्पल घेतले परंतु ते कचऱ्यात फेकले, त्यानंतर ‘बाळा’ सोबत असलेल्या आईचे सॅम्पल घेतले आणि ‘बाळा’चे सॅम्पल म्हणून दाखवले. हे आता सिद्ध झाल्यामुळे डॉ. तावरेची सुटका शक्य नाही. त्यामुळे तावरेच्या अडचणी वाढणार आहे. याच तावरेने डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येनंतर त्यांच्या शरीराचे शवविच्छेदन केले. त्यावेळी अनेक पुरावे गायब केल्याचा आरोप झाला आहे. हाच तावरे याआधी किडनी रॅकेटमध्ये अडकला होता. या प्रकरणात त्याला निलंबित करण्यात आले होते.

पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) किडनी रॅकेट प्रकरणी रुबी क्लिनिकमधील 15 डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किडनी रॅकेटप्रकरणी एका महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता, त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला. रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर ग्रँड परवेज यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कागदपत्रांची खात्री न करता दिशाभूल करून किडनी बदलली गेली, असा आरोप त्यांच्यावर आहे. कोल्हापूरच्या महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिची किडनी काढण्यात आली होती. याप्रकरणी तिने तक्रार दाखल केल्यानंतर आरोग्य विभाग कामाला लागले. संबंधित महिलेने आणि एजंटांनी बनवून दिलेली खोटी कागदपत्रे याची सत्यता पडताळणी डॉ. तावरे (Dr. Ajay Taware) अध्यक्ष असलेल्या विभागीय प्रत्यारोपण समितीने केली नसल्याचा ठपका समितीवर ठेवण्यात आला.

(हेही वाचा Pune Porsche Accident : नरेंद्र दाभोलकरांच्या शवविच्छेदनावेळी पुरावे गायब केल्याचा Dr. Ajay Taware वर संशय )

डॉ. तावरे होता अवयव प्रत्यारोपण मान्यता समितीचा अध्यक्ष

पुण्यात रुबी हॉल क्लिनिकमध्ये झालेल्या किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणी ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधीक्षकांवर कारवाई करण्यात आली होती. अधीक्षक डॉ. अजय तावरे (Dr. Ajay Taware) याला निलंबित करण्यात आले होते. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांनी यासंबंधीचे आदेश काढले होते. तावरे हा विभागीय अवयव प्रत्यारोपण मान्यता समितीचा अध्यक्ष होता. तर महिलेने पोलिसांत तक्रार केल्यावर वैद्यकीय विभागाने रुबी हॉल क्लिनिक आणि ससूनच्या सर्वोपचार अधीक्षकांवर कारवाई केली होती. आता याप्रकरणी पंधरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

डॉ. तावरे झालेला निलंबित 

डॉ. तावरे (Dr. Ajay Taware) हा ससून रुग्णालयाचा अधीक्षक आणि विभागीय अवयव प्रत्यारोपण मान्यता समितीचा अध्यक्ष होता. किडनी तस्करीप्रकरणी आरोग्य विभागाने सुरुवातीला रुबी हॉल क्लिनिकचा प्रत्यारोपण परवाना रद्द केला. त्यापाठोपाठ वैद्यकीय शिक्षण विभागानेदेखील चौकशी समिती नियुक्त करत ही कारवाई केली होती. तर तावरेचे निलंबन केल्यानंतर अधीक्षकपदाचा तात्पुरता पदभार उपाधीक्षक डॉ. विजय जाधव यांच्याकडे देण्यात आला होता. तावरे हा त्याच्या मूळ न्यायवैद्यक विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.