लोकसभा निवडणुकीतील अपयश लक्षात घेत भाजपाने आगामी विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election) पूर्ण गांभीर्याने लढविण्याचे ठरविले असून त्यासाठी आतापासून तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणूक तयारी आणि निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी भाजपाने येत्या शुक्रवारी (१४ जून) पक्षाची बैठक बोलवली आहे. या बैठकीत सद्य राजकीय स्थितीवर चर्चा होऊन विधानसभा निवडणुकीची आखणी केली जाणार आहे. (Vidhan Sabha Election)
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपयशाचा सामना करावा लागला. भाजपाने (BJP) शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेत लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला होता. मात्र, प्रत्यक्षात महायुतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभेच्या २८ जागा लढविणाऱ्या भाजपाला केवळ ९ जागा मिळाल्या. लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपासाठी धोक्याची घंटा ठरल्याने भाजपाने येत्या ऑक्टोबर महिन्यात होऊ घेतलेल्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. (Vidhan Sabha Election)
(हेही वाचा – Saulos Chilima : मलावीच्या उपराष्ट्रपतींसह ९ जणांचा विमान अपघातात मृत्यू)
या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजपा प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक १४ जून रोजी मुंबईत दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई विभागीय अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी तसेच मुंबईतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. (Vidhan Sabha Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community