नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मित्र सिद्धार्थ पिठाणी याला अटक केली. त्यानंतर सुशांतचे नोकर केशव आणि नीरज यांचा जबाब नोंदवला. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून एनसीबीने धाडसत्र सुरु केले. हे धाडसत्र मंगळवार, १ मे रोजी रात्रीपासून सुरु आहे. अंधेरी लोखंडवाला येथे हे धाडसत्र सुरु आहे. यामध्ये एनसीबीने हरीश खान आणि साकिब खान या दोन ड्रग्स पेडलर यांना अटक केली आहे. साकिब याला वांद्रे पोलिस ठाण्याने ताब्यात घेतले आहे. साकिब हा सुशांतला ड्रग्स पुरवत होता, ते ड्रग्स तो हरीश खान यांच्याकडून घ्यायचा, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
अजून कारवाया होणार!
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एनसीबीने ४ दिवसांपूर्वी मोठी कारवाई केली होती. एनसीबीने सुशांतचा मित्र आणि रुममेट सिद्धार्थ पिठाणीला अटक केली. हैदराबादमधून सिद्धार्थला अटक करण्यात आली. सिद्धार्थला अटक ड्रग्ज प्रकरणात करण्यात आली. सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज दिल्याचा सिद्धार्थवर आरोप आहे. एनसीबीची टीम सिद्धार्थला घेऊन मुंबईला येत असून त्याची चौकशी केली जाणार आहे. सिद्धार्थ पिठाणी हा सुशांत सिंह राजपूतसोबत त्यांच्याच फ्लॅटमध्ये राहत होता. सुशांतच्या मृतदेहाला सर्वात आधी सिद्धार्थनेच पाहिले होते. 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतने आपल्या वांद्रे स्थित निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येने सर्वांना मोठा धक्का बसला होता. सुशांत आत्महत्या करु शकत नाही त्याची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. त्याच्या कुटुंबीयांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप केले होते. आता एनसीबीने सिद्धार्थच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून पुन्हा धाडसत्र सुरु केले असून अटकसत्रही सुरु केले आहे.
(हेही वाचा : खासगी रुग्णालयांकडून होणारी लूट थांबणार… असे आहेत दर)
Join Our WhatsApp Community