Water Cut : पूर्व उपनगरांतील ‘या’ भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद

10954
Mumbai Water Supply : तुमच्या नळातून गढूळ पाणी येतंय का? घाबरु नका, कारण आहे हे!

मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) बी. डी. पाटील मार्ग, वाशीनाका येथील गवाणपाडा, एच. पी. सी. एल. रिफायनरी इत्यादी, शेवटच्या भागास पाणीपुरवठ्यामधील दाबामध्ये सुधारणा करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. या अंतर्गत ७५० मिलीमीटर व्यासाचे जलद्वार बसविण्याचे काम गुरुवारी १३ जून २०२४ रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या एम पूर्व आणि एम पश्चिममधील परिसरातील काही भागांमध्ये गुरुवारी १३ जून २०२४ रोजी सकाळी ११:०० ते रात्री ११:०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे या संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्‍याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात येत आहे. (Water Cut)

(हेही वाचा – Mumbai ATS: बनावट कागदपत्रांसह ४ बांगलादेशींना एटीएसकडून अटक, कशी केली कारवाई? वाचा सविस्तर)

कुठल्या भागात येणार नाही पाणी

एम पूर्व विभाग (बीट क्रमांक १४७ ते १४८) : लक्ष्मी वसाहत, राणे चाळ, नित्यानंद बाग, तोलाराम वसाहत, श्रीराम नगर, जे. जे. वाडी, शेठ हाइट्स, डोंगरे पार्क, टाटा वसाहत, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बी. पी. सी. एल.) वसाहत, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. (Water Cut)

(एच. पी. सी. एल.) वसाहत, गवाणपाडा, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एच. पी. सी. एल.) रिफायनरी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, टाटा पॉवर थर्मल प्लांट, भाभा अणु संशोधन केंद्र (बी. ए. आर. सी.), वरुण बेवरेजेस (पाणीपुरवठा बंद राहील). (Water Cut)

एम पश्चिम विभाग (बीट क्रमांक १५४ ते १५५) : माहुलगाव, आंबापाडा, जिजामाता नगर, वाशी नाका, मैसूर वसाहत, खाडी मशीन, रामकृष्ण चेंबूरकर (आर. सी.) मार्ग, शहाजी नगर, कलेक्टर वसाहत, सिंधी वसाहत, लालडोंगर, सुभाषचंद्र बोस नगर, नवजीवन सोसायटी, ओल्ड बराक, चेंबूर छावणी (पाणीपुरवठा बंद राहील). (Water Cut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.