Development Fund : मोदी सरकारने जारी केला विकास निधी; महाराष्ट्राला 8 हजार कोटी, तर यूपीला 25 हजार कोटी रुपये

NDA सरकारला पाठिंबा देणारे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या बिहारला (Bihar News) 14 हजार 056 कोटी रुपये संमत झाले आहेत.

175
Development Fund : मोदी सरकारने जारी केला विकास निधी; महाराष्ट्राला 8 हजार कोटी, तर यूपीला 25 हजार कोटी रुपये
Development Fund : मोदी सरकारने जारी केला विकास निधी; महाराष्ट्राला 8 हजार कोटी, तर यूपीला 25 हजार कोटी रुपये

एनडीए सरकारने (NDA Govt) राज्यनिहाय विकास निधीचा हप्ता मंजूर केला. यामध्ये महाराष्ट्राला (Maharashtra News) 8 हजार 828 कोटी रुपये, तर उत्तर प्रदेशला (Uttar Pradesh) 25 हजार 069 कोटी रुपयांचा निधी (Development Fund) मंजूर करण्यात आला आहे. NDA सरकारला पाठिंबा देणारे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या बिहारला (Bihar News) 14 हजार 056 कोटी रुपये संमत झाले आहेत.

(हेही वाचा – Reasi Bus Attack : रियासी हल्ल्यातील दहशतवाद्यांचा तपास अजूनही सुरू)

निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवार, 11 जून रोजी अर्थमंत्री पदाचा पदभार पुन्हा स्वीकारला. त्यानंतर राज्यांना विकास निधी (Development Fund) वाटपाचा निर्णय घेण्यात आला. सर्व राज्यांसाठी एकूण 1 लाख 39 हजार 750 कोटींचा निधी दिला आहे. जून 2024 महिन्यासाठीच्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त एक अतिरिक्त हप्ता जारी करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे या महिन्यात वितरित करण्यात आलेली जमा रक्कम 1 लाख 39 हजार 750 कोटी रुपये झाली आहे. यामुळे राज्य सरकारांना विकासाला आणि भांडवली खर्चाला चालना देता येईल, असे अर्थमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

2024-25 या वर्षाच्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्यांना कर हस्तांतरण रकमेपोटी 12 लाख 19 हजार 783 कोटी रुपयांची तरतूद आहे. ही रक्कम जारी केल्यानंतर 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 10 जून 2024 पर्यंत राज्यांना एकूण 2 लाख 79 हजार 500 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.