Dombivli MIDC Fire : डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा भीषण आग; धुराचे प्रचंड लोट

हा स्फोट (Boiler Blast in Dombivli) इतका भीषण होता की, हवेत धुराचे लोळ दिसत होते. या स्फोटामुळे (Dombivli midc Blast) डोंबिवलीतील रहिवाशी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.

218

डोंबिवली पूर्वेतील MIDC मधील इंडो अमाईन केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट (dombivli blast) झाला. या स्फोटामुळे डोंबिवली अन् आजूबाजूचा परिसर हादरला. हा स्फोट (Boiler Blast in Dombivli) इतका भीषण होता की, हवेत धुराचे लोळ दिसत होते. या स्फोटामुळे (Dombivli midc Blast) डोंबिवलीतील रहिवाशी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.

(हेही वाचा – Development Fund : मोदी सरकारने जारी केला विकास निधी; महाराष्ट्राला 8 हजार कोटी, तर यूपीला 25 हजार कोटी रुपये)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल

बॉयलरच्या स्फोटाचा आवाज 3 ते चार किलोमीटरपर्यंत ऐकू आला आणि आजूबाजूच्या घरांच्या, हॉटेल्स आणि ऑफिसच्या काचा फुटल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या, असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेतली आहे. तसेच तात्काळ प्रशासनाला नियंत्रण मिळवण्याचे आदेश दिले आहेत. अमुदान केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तीन तासांनंतरही हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबतची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. प्रशासनाकडून याबाबत कोणताही माहिती देण्यात आलेली नाही.

डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये ही कंपनी आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला, त्यापासून जवळच निवासी परिसर आहे. काही दिवसांपूर्वीच येथील अन्य एका कंपनीत झालेल्या स्फोटात १७ जणांनी जीव गमावला आहे. येथील शाळांमधील विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.