४०० पारचा नारा देऊनही लोकसभा निवडणुकीत बहुमत गाठण्यापासून भाजपा ३२ जागा दूर राहिला. या विषयी देशभर चर्चा चालू आहे. भाजपाच्या या परिस्थितीवर ऑर्गनायझर (The Organizer) साप्ताहिकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजीव सदस्य रतन शारदा यांनी भाजपाच्या डोळ्यात अंजन घालणारा लेख लिहिला आहे. मोदींच्या लोकप्रियतेमुळे तळातील सामान्यांचा आवाज न ऐकणाऱ्या भाजपाला ही एक चपराक असल्याचे ऑर्गनायझर लेखात म्हटले आहे.
रतन शारदा यांनी ऑर्गनायझरमध्ये “मोदी ३.० : कनव्हर्सेशन फॉर कोर्स करेक्शन” (Modi 3.0) या शीर्षकाखालील लेखात म्हटले आहे की, महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या. जसे की, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपाने आपली किंमत कमी करून घेतली.
(हेही वाचा – Parliament Session : लोकसभा निवडणुकीनंतर संसदेच्या पहिल्या अधिवेशनाची तारीख ठरली)
भाजपा हवेत वावरत होती
भाजपा (BJP) हवेत वावरत होती. जमिनीवरचे कार्यकर्ते अन् संघाशी संपर्क साधला गेला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य हे भाजपाचे मैदानावर काम करणारे कार्यकर्ते नाहीत. स्वयंसेवकांची मदत मागण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते आणि नेते कुठेतरी कमी पडले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातील भाजपा पक्ष आणि आताचा भाजपा पक्ष यात बराच फरक असल्याचे ते म्हणाले होते. मोदींचा चेहरासमोर ठेवून निवडणूक समोर ठेवून निवडणूक लढली गेली ही चूक आहे, असे परखड बोल या लेखात सुनावण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीचे (loksabha election 2024) पहिले दोन टप्पे झाल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एका मुलाखतीत राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर केलेले भाष्य वादाचा विषय ठरले होते. भाजपा आता मजूबत पक्ष बनला असून आम्हाला संघाच्या मदतीची गरज उरली नसल्याचे ते म्हणाले होते.
आरएसएस समर्थक खूप दुखावले
रतन शारदा यांनी ऑर्गनायझरच्या लेखात कुणाचेही नाव न घेता भाजपा नेत्यांच्या अतिआत्मविश्वासावर टीका केली आहे. त्यांना “लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल भाजपा कार्यकर्ता आणि नेत्यांना वास्तवाचे भान आणून देण्यास पुरेसे आहेत. भाजपा नेत्यांना हे कळले नाही की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४०० पार ची दिलेली घोषणा हे त्यांचे ध्येय आहे. विरोधकांचे नाही. भाजपने अशा काँग्रेस नेत्याचा पक्षात समावेश केला, ज्याने उघडपणे भगव्या दहशतवादाबद्दल विधान केले होते. त्याने २६/११ ला आरएसएसचे षड्यंत्र म्हटले होते. तसेच आरएसएसला दहशतवादी संघटना म्हटले होते. यामुळे आरएसएस समर्थक खूप दुखावले गेले. भाजपमध्ये आलेल्या या नेत्यांनी त्यांच्या या विधानावर खेद व्यक्त केला नाही किंवा माफी मागितली नाही. महाराष्ट्रातील या खेळीमुळे अनेक वर्ष काँग्रेसी विचारधारेला विरोध करणारा सच्चा भाजप समर्थक दुखावला. भाजप पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख सांगतो, परंतु भाजपची ओळख पार्टी विदाऊट एनी डिफरन्स अशी झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community