महाराष्ट्रातील चार नवनिर्वाचित खासदारांनी केंद्रीय मंत्रीमंडळात राज्यमंत्री पदावर सोपविलेल्या खात्यांचा कार्यभार स्वीकारला. या मंत्र्यांमध्ये रामदास आठवले, प्रतापराव जाधव, श्रीमती रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे. (Modi 3.0)
मुरलीधर मोहोळ यांनी सहकार मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा स्वीकारला पदभार
मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सहकार मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेतला. ‘विकसित भारत’ संकल्पनेच्या पूर्ततेसाठी सहकार मंत्रालय महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल, असा विश्वास मोहोळ यांनी या वेळी व्यक्त केला. (Modi 3.0)
(हेही वाचा- Ajit Pawar यांना बरोबर घेऊन भाजपाने स्वतःची किंमत कमी केली; RSS ने सुनावले परखड बोल)
रक्षा खडसे यांनी क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा स्वीकारला पदभार
रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार आज स्वीकारला. त्या सलग तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आलेल्या असून, महाराष्ट्रातील एकमेव महिला मंत्री म्हणून त्यांच्या कार्याची विशेष नोंद आहे. (Modi 3.0)
रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली
रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सामाजिक न्याय मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आज स्वीकारली. त्यांनी सामाजिक न्याय क्षेत्रात नव्या संधी निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. (Modi 3.0)
(हेही वाचा- Happy Krishna Janmashtami Wishes In Marathi : कृष्ण जन्माष्टमीचे १२ सर्वोत्तम संदेश; तुमच्या मित्रांना नक्कीच पाठवा)
प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला
प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा पदभार आज स्वीकारला. पदभार स्वीकारतांना त्यांनी औषधीय वनस्पती रोपण करून आरोग्य क्षेत्रात नव्या कल्पनांचा प्रारंभ केला. (Modi 3.0)
नवनिर्वाचित मंत्र्यांनी त्यांच्या-त्यांच्या खात्यांचा पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्याचा संकल्प करण्याचा निर्धार व्यक्त केला. (Modi 3.0)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community