- ऋजुता लुकतुके
यंदाचा टी-२० विश्वचषक कमी धावसंख्येचा ठरतोय आणि त्याचबरोबर धक्कादायक निकालांचाही. इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तानला धक्कादायक पराभवांना सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे यातील किमान दोन संघ साखळीतच गारद होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारतीय संघ ११९ धावांचं संरक्षण करण्यात यशस्वी झाला तर दुसऱ्याच दिवशी आफ्रिकन संघाने बांगलादेश विरुद्ध ११३ धावाही राखल्या. दुसरी फलंदाजी करताना भले भले संघही निष्प्रभ झाले आहेत. अशावेळी गटवार साखळीतील निम्मे सामने झाले असताना पाहूया कुठला संघ सुपर ८ च्या जवळ आहे आणि कुणाला हादरा बसू शकतो. (T20 World Cup 2024)
‘ए’ गट
- भारत (२ सामन्यांत २ विजय) – भारतीय संघाची धावगतीही १.४५५ अशी सकस आहे. पाकिस्तान आणि आयर्लंड या गटातील त्या मानाने अनुभवी संघांविरुद्ध भारताने विजय मिळवला आहे. त्यामुळे अमेरिका आणि कॅनडा विरुद्ध अगदीच अनपेक्षित पराभव झाला नाही, तर भारतीय संघाचं सुपर ८ मधील स्थान निश्चित आहे.
- अमेरिका (२ सामन्यांत २ विजय) – अमेरिकन संघाचा आतापर्यंतचा प्रवास स्वप्नवत आहे. आयर्लंड किंवा भारत यापैकी एक जरी सामना त्यांनी जिंकला तर त्यांचा सुपर ८ मधील प्रवेश नक्की आहे.
- कॅनडा (३ सामन्यांत १ विजय) – कॅनडाला आता आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताविरुद्धचा सामना जिंकावाच लागेल.
- पाकिस्तान (३ सामन्यांत १ विजय) – कॅनडा विरुद्धच्या विजयामुळे पाकिस्तानला दिलासा मिळाला आहे. आता आयर्लंड विरुद्ध मोठ्या फरकाने जिंकले तरंच त्यांना सुपर ८ ची आशा बाळगता येईल. अमेरिकेपेक्षा जास्त धावगती ठेवून अमेरिका उर्वरित दोन्ही सामने गमावेल अशी आशा त्यांना बाळगावी लागेल. अमेरिकेनं एक जरी सामना जिंकला तरी पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल.
- आयर्लंड (२ सामन्यांत ० विजय) – आयर्लंडला उर्वरित दोन सामने जिंकून इतर सामन्यांतील निकालावर लक्ष ठेवावं लागेल. सुपर ८ चा त्यांचा मार्ग खडतर आहे. (T20 World Cup 2024)
(हेही वाचा – Ajit Pawar यांना बरोबर घेऊन भाजपाने स्वतःची किंमत कमी केली; RSS ने सुनावले परखड बोल)
‘बी’ गट
- स्कॉटलंड (३ सामन्यांत ५ गुण) – २ विजय आणि अनिर्णित सामन्याचा एक गुण यामुळे स्कॉटलंडने या गटात सुपर ८ गाठल्यात जमा आहे. महत्त्वाचं म्हणजे अनिर्णित सामना हा बलाढ्य इंग्लंड विरुद्धचा होता.
- ऑस्ट्रेलिया (२ सामन्यांत ४ गुण) – आणखी एका विजयासह ऑस्ट्रेलियन संघ सुपर ८ मध्ये पोहोचू शकतो.
- नामिबिया (२ सामन्यांत २ गुण) – नामिबियाचे पुढील सामने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध आहेत. यातील किमान एक सामना त्यांना जिकावा लागेल आणि ते मोठं आव्हान असणार आहे.
- इंग्लंड (२ सामन्यांतून १ गुण) – स्कॉटलंड विरुद्धचा पावसामुळे अनिर्णित राहिलेला सामना त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे. आता नामिबिया आणि ओमान विरुद्धचे सामने जिंकून ऑस्ट्रेलिया, स्कॉटलंड सामन्याचा निकालावर त्यांची आगेकूच अवलंबून असेल.
- ओमान (३ सामन्यांतून ० गुण) – ओमानचं स्पर्धेतील आव्हान आटोपलं आहे. (T20 World Cup 2024)
‘सी’ गट
- अफगाणिस्तान (२ सामन्यांत ४ गुण) – अफगाणिस्तानचा पापुआ न्यू जिनी विरुद्धचा सामना बाकी आहे. तो जिंकला तर सुपर ८ मधील त्यांचं स्थान पक्कं आहे.
- वेस्ट इंडिज (२ सामन्यांत ४ गुण) – अफगाणिस्तान किंवा न्यूझीलंड यांच्यातील एक सामना जिंकला तर सुपर ८ मध्ये पोहोचतील.
- युगांडा (३ सामन्यांत २ गुण) – युगांडाला उर्वरित सामना खूप मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. इतर सामन्यांचे निकालही त्यांच्या बाजूने असतील तर सुपर ८ ची आशा बाळगता येईल.
- पापुआ न्यू जिनी (२ सामन्यांत ० गुण) – पापुआ न्यू जिनीची आगेकूच जवळ जवळ अशक्य आहे.
- न्यूझीलंड (१ सामन्यांत ० गुण) – आता अफगाणिस्तान विरुद्ध धक्कादायक पराभव झाला असला तरी उर्वरित ३ सामने जिंकून ते सुपर ८ मध्ये पोहोचू शकतील. (T20 World Cup 2024)
‘डी’ गट
- द आफ्रिका (३ सामन्यांत ६ गुण) – दक्षिण आफ्रिकन संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे.
- बांगलादेश (२ सामन्यांत २ गुण) – नेदरलँड्स आणि नेपाळ विरुद्धचे सामने बाकी आहेत. नेपाळचा सामना मोठ्या फरकाने जिंकून आगेकूच करण्याची आशा ते बाळगू शकतात.
- नेदरलँड्स (२ सामन्यांत २ गुण) – नेदरलँड्सला बांगलादेश आणि नेपाळ विरुद्ध जिंकावं लागेल.
- नेपाळ (३ सामन्यांत १ गुण) – श्रीलंकेविरुद्धचा सामना पावसात वाहून गेल्यामुळे आव्हान कठीण झालं आहे.
- श्रीलंका (३ सामन्यांत १ गुण) – नेपाळ विरुद्धचा सामना पावसात वाहून गेल्यामुळे आव्हान कठीण झालं आहे. (T20 World Cup 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community