T20 World Cup Ind vs USA : भारताला आशा युवा शिवम दुबे चमकण्याची

T20 World Cup Ind vs USA : पाकिस्तान विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात शिवमने झेलही सोडला होता.

160
T20 World Cup Ind vs USA : भारताला आशा युवा शिवम दुबे चमकण्याची
  • ऋजुता लुकतुके

टी-२० विश्वचषकात आतापर्यंत भारतीय संघाला (Indian team) कुठलीही अडचण फारशी जाणवलेली नाही. नसॉ काऊंटीची खेळपट्टी आव्हानात्मक असली तरी एकूणच अमेरिकेत खेळपट्ट्या खराब आहेत आणि सगळ्याच संघांना त्याचा फटका बसलाय. ते पाहता, भारतीय संघाने खेळपट्टीशी जुळवूनच घेतलंय, असं म्हणावं लागेल. गोलंदाजही चमकदार कामगिरी करतायत. भारताला काळजी आहे ती युवा धडाकेबाज फलंदाज शिवम दुबेच्या फॉर्मची. (T20 World Cup Ind vs USA)

३० वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने तळाला येत फिरकीपटूंची धुलाई केली आहे. आयपीएलमध्ये (IPL) चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी आणि मिळालेल्या कमी संधींमध्ये भारतासाठीही ही भूमिका आतापर्यंत त्याने चोख बजावली आहे. पण, विश्वचषकात आतापर्यंत ती भूमिका त्याला निभावता आलेली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तान विरुद्ध त्याने मोहम्मद रिझवानचा एक सोपा झेल फाईन लेगला सोडला. हा झेल त्याला हातात आला होता. असे झेल सुटणे हे आत्मविश्वास कमी झाल्याचं लक्षण मानलं जातं आणि त्याची काळजी भारतीय संघ प्रशासनाला नक्कीच वाटत असणार. (T20 World Cup Ind vs USA)

(हेही वाचा – Ayodhya: राम मंदिराची सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची तयारी सुरू, दहशतवादाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारची योजना काय ? वाचा सविस्तर…)

रोहितने स्पष्ट केली होती ‘ही’ गोष्ट 

भारतीय संघात निवडीची घोषणा झाली तेव्हापासून आयपीएलमध्येही त्याचा सूर हरवला होता. आता विश्वचषकाच्या पहिल्या २ सामन्यांतही तो चमक दाखवू शकलेला नाही. आता सुपर ८ चं आव्हान सुरू होईल. तिथे त्याच्याकडून रोहित शर्माला अपेक्षा असतील. (T20 World Cup Ind vs USA)

अंतिम अकरा खेळाडूंमध्ये त्याची निवड होण्याचं काही ठोस कारण आहे. रोहित शर्माला (Rohit Sharma) फलंदाजीच्या क्रमात लवचिकता हवी आहे. विराट कोहलीला सलामीला खेळवायचं झालं तर मधल्या फळीत यशस्वी आणि शिवम या दोन पर्यायांमध्ये अष्टपैलूत्वामुळे शिवमच्या पारड्यात संघाचं मत जातं. पण, रोहितने पत्रकारांशी बोलताना एक गोष्ट स्पष्ट केली होती. ‘सलामीच्या दोन जागा सोडल्या तर फलंदाजांचा क्रम निश्चित नाही. सूर्यकुमार, रिषभ, शिवम, यशस्वी, हार्दिक, जाडेजा हे फलंदाज कुठल्याही क्रमांकावर येऊ शकतात,’ असं रोहित तेव्हा म्हणाला होता. आताही पाकिस्तान विरुद्ध अक्षर पटेलला चौथ्या क्रमांकावर आणलं आणि २० धावा करत त्याने ही संधी साधलीही. तेव्हा आता उर्वरित दोन साखळी सामन्यांमध्ये शिवम दुबेला मिळालेली संधी साधावी लागेल. (T20 World Cup Ind vs USA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.