मोदी सरकारचा शपथविधी नुकताच पार पडला. त्यानंतर नवनियुक्त मंत्री आणि खासदार यांच्याकडे किती संपत्ती आहे. कोण सर्वाधिक श्रीमंत आहे. कुणाचे शिक्षण किती. कोणत्या पक्षाच्या खासदारावर किती गुन्हे दाखल आहेत. या संदर्भातील एक अहवाल असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) ने जारी केला आहे. त्या अहवालात दिलेल्या माहितीवरून एकूण सर्वच पक्षातील खासदारांविषयी मिळालेली माहिती अशी. (Modi 3.0)
मोदी ३.० च्या नवीन केंद्रीय मंत्रिमंडळातील ७१ मंत्र्यांपैकी ८०% पदवीधर किंवा त्याहून अधिक आहेत. त्याच वेळी ११ (१५%) मंत्र्यांनी त्यांची शैक्षणिक पात्रता १२वी असल्याचे घोषित केले आहे. डिप्लोमाधारक ३ आहेत. तसेच मंत्र्यांवर नोंदवलेल्या फौजदारी गुन्हे पाहिल्यास २८ (३९%) मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी १९ जणांवर खुनाचा प्रयत्न, अपहरण, महिलांवरील गुन्हे इत्यादी गंभीर गुन्हे दाखल आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने जारी केलेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे. (Modi 3.0)
(हेही वाचा – T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषकात कुठल्या संघाला आहे सुपर ८ ची किती संधी?)
कोट्यधीश मंत्र्यांबद्दल बोलायचे तर ७० (९८.५%) मंत्र्यांकडे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. यापैकी ६ जणांनी १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती जाहीर केली आहे. सर्वात कमी संपत्ती HAM पार्टीच्या (३० लाख+) जितन राम मांझी यांनी घोषित केली आहे. शिवाय, एडीआरनुसार, ७१ मंत्र्यांची सरासरी मालमत्ता १०७.९४ कोटी रुपये आहे. (Modi 3.0)
१८व्या लोकसभेचा निकाल ४ जून रोजी लागला. ५४३ नवनिर्वाचित खासदारांपैकी ४६% म्हणजे २५१ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी २७ खासदारांना वेगवेगळ्या न्यायालयांनी दोषी ठरवले आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालानुसार, कलंकित खासदारांची ही आजपर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. यापूर्वी २०१९ मध्ये फौजदारी खटले असलेले २३३ (४३%) खासदार लोकसभेत पोहोचले होते. (Modi 3.0)
(हेही वाचा – Modi 3.0 : महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदारांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला)
२५१ नवनिर्वाचित खासदारांपैकी १७० जणांवर बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांवरील गुन्ह्यांचे गुन्हे दाखल आहेत. भाजपाच्या ६३, काँग्रेसच्या ३२ आणि सपाच्या १७ खासदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. या यादीत तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) ७, द्रमुकचे ६, तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) ५ आणि शिवसेनेच्या ४ खासदारांची नावे आहेत. (Modi 3.0)
२५१ नवनिर्वाचित खासदारांपैकी १७० जणांवर बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांवरील गुन्ह्यांचे गुन्हे दाखल आहेत. भाजपाच्या ६३, काँग्रेसच्या ३२ आणि सपाच्या १७ खासदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. या यादीत तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) ७, द्रमुकचे ६, तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) ५ आणि शिवसेनेच्या ४ खासदारांची नावे आहेत. (Modi 3.0)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community