डोडा जिल्ह्यात बुधवारी, (१२ जून) पहाटे दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये सैन्य दलाचे ५ जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचा १ विशेष पोलीस अधिकारी असे ६ जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी मध्यरात्री १.४५ वाजता डोडा येथील छत्तरगल्ला भागातील सैन्यदल आणि स्थानिक पोलिसांच्या चेकपोस्टवर हल्ला केला. जखमींना भदेरवाह शहरातील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी जखमींची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे. (Terrorist Attack)
कठुआ जिल्ह्यात कुटा मोरहुंदर हिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीजवळील सैदा सुखल गावात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. सीआरपीएफच्या मदतीनं परिसराची नाकेबंदी केली असून घरोघरी पाहणी करत दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. जम्मू झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आनंद जैन म्हणाले, “२ दहशतवादी सीमेपलीकडून घुसलेले दिसले. ते रात्री ८च्या सुमारास सैदा सुखल गावात आले. त्यांनी एका घरातून पाणी मागविल्यानंतर लोक घाबरले. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्टेशन हाऊस ऑफिसर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचं पथक गावात दाखल झालं.” (Terrorist Attack)
(हेही वाचा – Red Fort Attack Case: पाकिस्तानी दहशतवाद्याचा दयेचा अर्ज राष्ट्रपती मुर्मू यांनी फेटाळला)
#Army and #Police joint Naka has engaged #terrorist in area of Chattargala area of #Doda . Firefight is going on.
More details to follow— ADGP Jammu (@adgp_igp) June 11, 2024
एक दहशतवादी ठार
एडीजीपीच्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्याच्या ताब्यातून एके असॉल्ट रायफल आणि एक रक्सॅक जप्त केली आहे. हा दहशतवादी कोणत्या संघटनेशी संबंधित आहे, याबाबत तपास सुरू आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ग्रेनेड फेकण्याचा प्रयत्न करणारा दहशतवादी ठार झाला, तर दुसरा दहशतवादी गावात लपून बसला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community