उबाठा नेत्यांनी स्वाभिमान पाकिस्तानच्या झेंड्यासमोर गहाण ठेवला; Nitesh Rane यांचे टिकास्त्र

171
उबाठा नेत्यांनी स्वाभिमान पाकिस्तानच्या झेंड्यासमोर गहाण ठेवला; Nitesh Rane यांचे टिकास्त्र

वैष्णोदेवी दर्शनाला जाणाऱ्या भक्तांच्या बस गाडीवर दहशतवादी हल्ला झाला. आतापर्यंत १८ वैष्णोदेवी भक्तांनी या हल्ल्यात प्राण गमावले. आज हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर अशा दहशतवाद्यांना थेट इशाराच दिला असता. बाळासाहेब हे मुंबईत बसून पाकिस्तान हादरवून सोडण्याची ताकद असलेले नेते होते. मात्र आताची उबाठा आणि त्यांचे नेते प्रवक्ते हे राजकारणापलीकडे काहीच बोलत नाहीत. दहशतवाद्यांना अद्दल घडवू असे बोलण्याची त्यांच्या हिम्मत नाही. उबाठाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे इमान आणि स्वाभिमान पाकिस्तानच्या झेंड्यासमोर गहाण ठेवला आहे. त्यामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्यापूर्वी त्यांचे विचार आत्मसात करा अशी टीका भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले आहे. कणकवली येथे ते माध्यमांशी बोलत होते. (Nitesh Rane)

आमच्या हिंदूंवर अतिरेकी हल्ले होत असतील तर पाकिस्तानचे झेंडे फडकवणाऱ्यावर आम्ही कारवाई करू असे संजय राऊत बोलतील का? ते बोलणार नाहीत. मात्र त्यांना चोख उत्तर मोदी साहेब, शहा साहेब देतील असा इशारा यावेळी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला. उबाठाला महाविकास आघाडीत किती दिवस ठेवायचे हे आम्ही ठरवू अशी धमकीच काँग्रेसने दिल्ली वरून दिली आहे. मात्र हिम्मत असेल तर मुंबई पदवीधरची जागा लढवा. काँग्रेसला कोकण पदवीधर मतदार संघ दिला आहे. कारण उबाठाला आपले कोकणातील अस्तित्व संपले हे माहित असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले. ३७० कलम हटविले. त्यामुळे काश्मीरमध्ये किती शांतता आहे हे संजय राऊत यांनी स्वतःच्या कुटुंबासोबत जाऊन बघावे. आता त्याठिकाणी उरलेल्या चार अतिरेकी टाळक्यांना मोदीसाहेब या वेळी धडा शिकवतील असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. (Nitesh Rane)

(हेही वाचा – MNS: विधानसभा निवडणुकीसाठी मनसे महायुतीकडे ‘या’ २० जागा मागणार?)

रोज सकाळी ४२० असलेल्या भ्रष्टाचारी संजय राऊत या माणसाला उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या माथी मारलेला आहे. त्याला आधी थांबवा, अशी टीका संजय राऊत यांच्यावर केली. मागच्या दरवाजातून येणाऱ्यांना निवडणूक कधीच कळणार नाही, असे आमदार राणे म्हणाले. मविआने ३० ते ३१ जागा पाकिस्तानचा झेंडा फडकवून जिंकलेल्या आहेत. याचा जल्लोष पाक मध्ये जास्त झाला. उद्धव ठाकरे यांचा नागरी सत्कार पाकिस्तानमध्ये झाला तर त्याचे नवल वाटायला नको, असे आमदार राणे (Nitesh Rane) म्हणाले. सर्वात मोठा हप्तेखोर संजय राऊत आणि त्याचा मालक आहेत. त्यांनी दुसऱ्यांना हप्तेखोर बोलू नये. डोंबिवलीत जी आग लागण्याची घटना घडली अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून आमचे नेते मंत्री रवींद्र चव्हाण, उदय सामंत बारकाईने लक्ष ठेवून आहेत. योग्य ती पावल उचलली जातील, असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा यावे म्हणून आम्ही काम करत आहोत. आम्ही पदासाठी काम करत नाही असे एका प्रश्नांवर बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले. (Nitesh Rane)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.