- विशेष प्रतिनिधी, मुंबई
वेसावे (वर्सोवा) येथील अनधिकृत (Varsova Unauthorised Construction) बांधकामाविरोधातील मोहीम आता मुंबई महानगरपालिकेने (BMC) अधिक तीव्र केली आहे. वेसावेतील शिव गल्लीमध्ये अनधिकृतपणे बांधकाम सुरू असलेल्या तीन इमारतींवर मंगळवारी ११ जून २०२४ रोजी कारवाई केल्यानंतर बुधवारी १२ जून २०२४ रोजी आणखी एका इमारतीवर तोडक कारवाई करण्यात आली. तळमजला आणि त्यावर दोन मजले असे या इमारतीचे स्वरुप होते. (Varsova Unauthorised Construction)
(हेही वाचा- Rajya Sabha Election : अजित पवार गटाने राज्यसभा निवडणुकीसाठी कंबर कसली; ‘ही’ नावे चर्चेत)
वेसावे भागातील पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या दलदलीच्या प्रदेशावर आणि सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रात (कोस्टल रेग्यूलेशन झोन) उद्भवलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे (Dr. Sudhakar Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त (परिमंडळ-४) विश्वास शंकरवार (Vishwas Shankarwar) आणि सहायक आयुक्त (के पश्चिम विभाग) डॉ. पृथ्वीराज चव्हाण (Dr. Prithviraj Chavan) यांच्या नियंत्रणाखाली कठोर कारवाई करण्यात येत आहे. वेसावेतील अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने एका विशेष पथकाचीही स्थापना करण्यात आली आहे. (Varsova Unauthorised Construction)
वेसावे गावातील शिव गल्ली येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेली आठ हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेली इमारत बुधवारी १२ जून २०२४ रोजी महापालिकेच्या पथकाने पाडली केली. मुंबई महानगरपालिकेचे १० अधिकारी, ५० कामगार अशा मनुष्यबळासह दोन पोकलेन संयंत्र, १० इलेक्ट्रिक ब्रेकर्स, तीन गॅस कटर्स आदी संसाधनांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. यावेळी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात होता. (Varsova Unauthorised Construction)
(हेही वाचा- हिंदु संत आणि संप्रदाय यांची बदनामी करणार्या Maharaj Film वर तत्काळ बंदी घालण्याची मागणी)
दरम्यान, वेसावे गाव आणि परिसरामध्ये अशाप्रकारे निर्माण झालेली अनधिकृत बांधकामे पूर्णपणे तोडली जात नाही तिथं पर्यंत ही मोहीम सुरूच राहील. या भागात कोणतेही नवीन अनधिकृत बांधकाम निर्माण होणार नाही, याचीही दक्षता घेतली जाईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे. (Varsova Unauthorised Construction)
वेसावे परिसरात साचलेल्या गाळामध्ये मच्छीमार बांधवांना बोटी ठेवता येत नसल्याचे पत्र मच्छीमारांनी केलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र सागरी मंडळाने पाठवले होते. यानिमित्ताने के पश्चिम विभागाचे अधिकारी पाहणी दौऱ्यासाठी आले असताना अनधिकृत बांधकाम आढळल्याने ही कार्यवाही मोहीम स्थानिक पातळीवर हाती घेण्यात आली. त्यानुसार प्रथम ०३ जून रोजी या परिसरातील अनधिकृत बांधण्यात आलेल्या तीन इमारतींवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ११ जून रोजी आणखीन शिव गल्लीतील आणखी तीन इमारती आणि आज आणखीन एका इमार्तीवर कारवाई करण्यात आली. अशाप्रकारे एकूण ७ अनधिकृत आणि बांधकाम सुरू असलेल्या इमारतींवर करवाई करण्यात आली आहे. (Varsova Unauthorised Construction)
अनधिकृत बांधकामांची यादी तयार
बांधकाम सुरू असलेल्या आणि बांधकाम पूर्ण झालेल्या बांधकामांवर पोलिसांच्या मदतीने तोडक कार्यवाही पूर्ण करण्यात आली. तसेच आगामी कालावधीत पोलीसांच्या मदतीने तोडक कार्यवाही राबविण्यात येणार आहे. अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या अनुषंगाने यादी तयार करण्यात येत असल्याची माहिती के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांनी यापूर्वीच जाहीर केले होते, त्यानुसार ही कारवाई होत आहे. (Varsova Unauthorised Construction)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community