रिक्षा चालकाची मुलगी झाली तिरंदाज – Deepika Kumari

176
रिक्षा चालकाची मुलगी झाली तिरंदाज - Deepika Kumari
रिक्षा चालकाची मुलगी झाली तिरंदाज - Deepika Kumari

दीपिका कुमारी (Deepika Kumari) एक भारतीय व्यावसायिक तिरंदाज आहे. तिने २०१० च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. याच स्पर्धेत तिने डोला बॅनर्जी आणि बॉम्बयाला देवी यांच्यासह महिलांच्या सांघिक रिकर्व्ह स्पर्धेत देखील सुवर्णपदक मिळवले. (Deepika Kumari)

दीपिका कुमारीचा (Deepika Kumari) जन्म बिहारमधील रांची येथे १३ जून १९९४ रोजी झाला. तिचे वडील एक ऑटो-रिक्षा चालक आहे आणि आई रांची मेडिकल कॉलेजमधील परिचारिका आहे. नेमबाजीचा तिचा प्रवास गंमतीदार आहे. लहानपणी नेम धरुन ती दगडाने आंबे पाडायची. मात्र तिला कुठे माहित होतं की ही नेमबाजी देशाच्या कामी येईल! पुढे तिला तिरंदाजीत खूप आवड निर्माण झाली. मात्र तिच्या पालकांना आर्थिकदृष्ट्या ही आवड जोपासता आली नाही. म्हणून तिने बाजारातून धनुष्य विकत न घेता बांबूचा धनुष्य आणि बाण तयार केला. (Deepika Kumari)

(हेही वाचा- T20 World Cup, Ind vs USA : अमेरिकेला ७ गडी राखून हरवत भारताचा सुपर ८मध्ये प्रवेश )

दीपिकाने (Deepika Kumari) विश्वचषक स्पर्धेच्या तीनपैकी दोन टप्प्यात वैयक्तिक सुवर्ण जिंकले आहे – एक ग्वाटेमाला आणि दुसरे पॅरिसमध्ये. तिने पॅरिस विश्वचषकात तब्बल नऊ वर्षांनंतर पहिला क्रमांक मिळवून हिंदुस्थानाची मान उंचावली. दीपिका कुमारीने तिरंदाजी विश्वचषक स्टेज १ मध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. दीपिका कुमारीने (Deepika Kumari) पॅरिसमध्ये अंतिम फेरीत मेक्सिकोचा ५-१ असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. दीपिकाची घोडदौड अजूनही सुरुच आहे. २०१२ मध्ये अर्जून पुरस्कार देऊन तिचा सन्मान करण्यात आला. २०१७ मध्ये तिच्या आयुष्यावर ’लेडीज फर्स्ट’ नावाचा एक चरित्रात्मक माहितीपट येऊन गेला. (Deepika Kumari)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.