विलियम बटलर येट्स (William Butler Yeats) हा आयरिश कवी, नाटककार आणि लेखक होता. आयरिश साहित्याला नवी ओळख देण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. त्याने लेडी ग्रेगरी सोबत ॲबे थिएटरची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात त्याने या थिएटरचे प्रमुख म्हणून काम पाहिले. विशेष म्हणजे १९२३ मध्ये त्याला साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. (William Butler Yeats)
त्याचा जन्म १३ जून रोजी आयर्लंडमधील काउंटी डब्लिनमधील सँडिमाउंट येथे झाला. त्याचे वडील, जॉन बटलर येट्स, जेर्विस येट्सचे वंशज होते, तसेच सैनिक, तागाचे व्यापारी आणि सुप्रसिद्ध चित्रकार होते. येट्सचे शिक्षण डब्लिन आणि लंडनमध्ये झाले. त्याने लहानपणीच त्याला आयरिश दंतकथा आणि गूढकलेची भुरळ पडली. तेव्हा तो कवितेचा अभ्यास करु लागला. (William Butler Yeats)
(हेही वाचा- Uddhav Thackeray: ठाकरे, राऊत यांची विशेष न्यायालयात धाव; कारण काय?)
सुरुवातीला त्याने ज्या कविता रचल्या, त्यावर जॉन कीट्स, विल्यम वर्डस्वर्थ, विल्यम ब्लेक आणि इतर अनेक प्रतिभावान कवींचा प्रभाव होता. १८८९ मध्ये त्याचा सर्वात पहिला संग्रह प्रकाशित झाला. आयरीश साहित्याला जी मरगळ आली होती, ती येट्सने झटकली आणि खर्या अर्थाने त्याने आयरिश साहित्याला पुनरुज्जीवीत केले. पुढे त्याने आयरिश फ्री स्टेटचे सिनेटर म्हणून दोन वेळा काम केले आहे. (William Butler Yeats)
१८९७ मध्ये आयरिश लिटररी थिएटरचा तो मुख्य नाटककार झाला होता आणि सुरुवातीच्या काळात एझरा पाउंडसारख्या तरुण कवींना त्याने प्रोत्साहन दिले होते. द लँड ऑफ हार्ट्स डिझायर, कॅथलीन नी हॉलिहान, डियर्डे, द वाइल्ड स्वान्स ॲट कूल, द टॉवर अशी साहित्यकृती त्याने निर्माण करुन रसिकांना भुरळ पाडली. (William Butler Yeats)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community