शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक प्रदेशाध्यक्ष रोहित पवार यांनी अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांना राज्य सभेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्याबाबत टीका केली. यावरून राष्ट्रवादी अप (अजित पवार) आणि शप (शरद पवार) यांच्यात ‘X’वर नवे वॉर सुरू झाले आहे तर अजित पवार यांनी “पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती टिकेल इतरांचा काही भरवसा नाही,” अशी रोहित पवार यांनी ‘X’वर टीका केली आणि ट्रोल झाले. (Sunetra Pawar Nomination)
पळत्याच्या गळ्यात राज्यसभा नको…
रोहित पवार यांनी ‘X’वर पोस्ट केली की, “आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही.. त्यामुळं पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती टिकेल इतरांचा काही भरवसा नाही, अशी चर्चा सुरूय… म्हणूनच सुनेत्राकाकी किंवा पार्थ यांना Advance मध्ये शुभेच्छा आणि अभिनंदन!!!” (Sunetra Pawar Nomination)
आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर वसवलं गेलं असलं तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही.. त्यामुळं पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच ती…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 12, 2024
आज अचानक ‘घरातल्या विश्वासू’ झाल्या…
नेटकऱ्यांनी रोहित पवार यांच्यावरच तोंडसुख घेत त्यांना प्रचंड ट्रोल केले. “लोकसभेच्या आधी सुनेत्रा पवार या ‘घरातल्या विश्वासू’ नव्हत्या… त्या ‘बाहेरून आलेल्या’ होत्या… आज अचानक ‘घरातल्या विश्वासू’ झाल्या.. ! शरद पवारांसारख्या खेळी करणं अजून नीट जमत नाहीये रोहित दादाला!” अशा शब्दात एकाने सुनावले. (Sunetra Pawar Nomination)
(हेही वाचा – T20 World Cup, Ind vs USA : अर्शदीप सिंगचा भारतासाठी अनोखा विक्रम)
इतका द्वेष घरातूनच…?
एकाने रोहित यांच्या मानसिकतेवर घाला घातला आणि पोस्ट केले की, “पवारांच्या घरातील उमेदवार असूनही तुम्हाला त्याचा त्रास होतोय म्हणजे अजब च आहे ना हे….???? इतका द्वेष घरातूनच…????? असो आपल्या पक्षात काय चालले आहे ते बघा दादा…” (Sunetra Pawar Nomination)
जयंत पाटलांवर तुमचा भरोसा नाय?
एकाने तर अंतर्गत वादावर बोट ठेवत, “याचा अर्थ आदरणीय अजित दादांना सोडून तुम्ही एक वेगळं घर बसवल आहे म्हणजे अध्यक्ष पद तुम्हाला हवंय. जयंत पाटलांवरती तुमचा भरोसा नाही, असा पवार साहेबांना मेसेज द्यायचा आहे का रोहितदादा..” असे म्हटले. (Sunetra Pawar Nomination)
रिप्लेसमेंट म्हणून ‘यांना’ मार्केट मध्ये आणलं
रोहित पवार यांनी केलेल्या टीकेला नेटकऱ्यांनी उत्तर दिलेच पण राष्ट्रवादी (अप) प्रवक्ते सूरज चव्हाण यांनीही ‘X’वर, “तुमच्यावर होत असलेला अन्याय आणि तुमच्या महत्वाकांक्षा पाहून तुम्ही साहेबांसोबत किती दिवस राहाल याचा पत्ता नाही. लवकरच तुम्ही नवा घरोबा कराल यात माझ्या मनात शंका नाही आणि महत्वाकांक्षेपायी ब्रम्हदेवही तुम्हाला थांबवू शकत नाही. त्यामुळे रिप्लेसमेंट म्हणून जोगेंद्र पवार यांना मार्केट मध्ये आणलं आहे,” अशा शब्दात राष्ट्रवादी (शप) मधील वाभाडे काढले. चव्हाण यांनी जोगेंद्र चुकून लिहिले की युगेंद्र (शरद पवार यांचे दुसरे नातू) असे म्हणत नाव घेणे टाळले, ते कळू शकले नाही. (Sunetra Pawar Nomination)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community