Western Railwayची भन्नाट आयडिया! आता इंडिकेटर शोधण्याची गरज नाही

949
Western Railwayची भन्नाट आयडिया! आता इंडिकेटर शोधण्याची गरज नाही
Western Railwayची भन्नाट आयडिया! आता इंडिकेटर शोधण्याची गरज नाही

पश्चिम रेल्वेने (Western Railway) नेहमीच उपनगरीय लोकलच्या प्रवाशांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आघाडी घेतली आहे. पहिली महीला स्पेशल लोकल असो की पहिली एसी लोकल याची सुरुवात पश्चिम उपनगरीय मार्गावरुनच झाली आहे. आता पश्चिम रेल्वेच्या लोकलच्या डब्यांनाच लांब पल्ल्यांच्या मेल- एक्सप्रेस डब्यांच्या प्रमाणे डिजिटल डिस्प्ले बसविण्याची सुरुवात केली आहे. पश्चिम रेल्वेने प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग केला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना लोकल कोणती आहे हे पटकन समजाणार आहे. त्यासाठी इंडिकेटरकडे पाहण्याची गरज नाही, तर सरळ दुसऱ्या फलाटावर वरुन लोकल कोणती आहे? ते पाहाता येणार आहे. (Western Railway)

लोकलच्या कोचलाच थेट डिजिटल डिस्प्ले

मुंबई उपनगरीय लोकलच्या मोटरमनच्या कोचपुढे आणि गार्डच्या डब्याच्या मागेच नामफलक असतो. त्यामुळे कोणती ट्रेन आहे हे पाहण्यासाठी प्रवाशांना त्रास होतो. प्रवाशांना एकतर ट्रेनच्या मोटरमनच्या डब्यांकडे पाहावे लागते किंवा इंडिकेटरवर मानवर करून पाहावे लागते. एखादी ट्रेन कोणत्या गंतव्य ( शेवटचे स्थानक ) स्थानकासाठी लागली आहे. हे पटकन दुसऱ्या फलाटावरील उभ्या असलेल्या प्रवाशांना समजण्यासाठी आता उपनगरीय लोकलच्या डब्यांना एक्सप्रेसच्या गाड्यांच्या धर्तीवर कोचलाच थेट डिजिटल डिस्प्ले लावण्याचा अभिनव प्रयोग पश्चिम रेल्वेने केला आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. (Western Railway)

आता इंडिकेटरकडे मान वर करुन पहात बसावे लागणार नाही

मुंबई उपनगरीय लोकलच्या मोटर कोचच्या बाजूच्या पॅनलवर डायनॅमिक पॅनोरमा डिजिटल डिस्प्ले प्रायोगिक तत्वावर बसविला आहे. त्यामुळे प्रवाशांना तात्काळ आणि अचूकपण लोकलचे गंतव्यस्थानक कोणते आहे? डब्यांचा क्रमांक, आणि संबंधित लोकल स्लो आहे की फास्ट हे देखील समजणार आहे. त्यासाठी आता इंडिकेटरकडे मान वर करुन पहात बसावे लागणार नाही. हे अभिनव डिस्प्ले पश्चिम रेल्वेच्या सर्वच लोकल ट्रेनला लवकरच बसविण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर (Western Railway) दररोज 36 लाख प्रवासी प्रवास करीत असतात. या प्रवाशांना या सेवेचा फायदा होणार आहे. (Western Railway)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.