- ऋजुता लुकतुके
आगामी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्पेनची राफेल नदाल आणि कार्लोस अल्काराझ हे टेनिसमधील स्टार खेळाडू दुहेरीत एकत्र खेळणार आहेत. स्पेनच्या राष्ट्रीय टेनिस संघटनेनं तशी घोषणा केली आहे. त्यामुळे चाहत्यांना दोघांना एकत्र बघण्याचा आनंद मिळणार आहे. नदालने यापूर्वी २००८ मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण मिळवलं आहे. तर २१ वर्षीय अल्काराझची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा असेल. गेल्याच महिन्यात अल्काराझने रोलँड गॅरोसवर फ्रेंच ओपन विजेतेपद पटकावलं आहे. त्याच मैदानावर आता अल्काराझ ऑलिम्पिकमध्ये उतरणार आहे. ३८ वर्षीय नदाल सध्या दुखापतींशी झुंजतो आहे. फ्रेंच ओपनमध्येही पहिल्याच फेरीत त्याला गाशा गुंडाळावा लागला. (Paris Olympic 2024)
‘स्पेनला ऑलिम्पिकमध्ये दोन जोड्या उतरवता येणार आहेत आणि यातील एका जोडीबद्दल आतापर्यंत सगळ्यांना कळलं असेलच. ती जोडी आहे नदाल आणि अल्काराझ. अजून अधिकृत घोषणा केली नसली, तरी आमची पहिली जोडी ठरलेली आहे. दुसरी जोडी आम्ही लवकरच ठरवू,’ असं स्पेनचे राष्ट्रीय टेनिस प्रशिक्षक डेव्हिड फेरर यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं. (Paris Olympic 2024)
2004: Nadal made his Olympic debut, playing doubles with his childhood idol and current coach, Carlos Moya, who was playing in his last Olympics.
2024: Nadal, in his last Olympics, will play doubles with Alcaraz, who idolizes him and is making his Olympic debut.
Full-circle. ♻️ pic.twitter.com/OeIzue9i4c
— ً (@nadalprop_) June 12, 2024
(हेही वाचा – Shardul Thakur : शार्दूल ठाकूरच्या घोट्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया)
नदाल आणि अल्काराझ यांच्याबरोबर स्पॅनिश संघात पाबलो करेने बुस्ता, अलेक्झांड्रो डेव्हिडोविच फोकिना यांचा समावेश आहे. तर जागतिक क्रमवारीत दुहेरीत दुसऱ्या स्थानावर असलेला मार्सेल ग्रॅनोलर याचाही संघात समावेश आहे. नदालचं हे शेवटचं ऑलिम्पिक असणार आहे. त्यामुळे दुखापतीतून सावरून तो खेळू शकला तर नदाल आणि अल्काराझचा प्रयत्न असेल तर एकत्र पदक जिंकण्याचा. (Paris Olympic 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community