यंदा मुंबई विद्यापीठात B. Com ला सर्वाधिक पसंती

215
Assembly Session : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलमधील समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल २१ मे रोजी लागला. यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली होती. पुढील शिक्षणसाठी तसेक मुंबई विद्यापीठाशी संलग्नित, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रवेश घेण्याकरिता २ लाख ५० हजार ४५३ विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी ८ लाख ७० हजार ५९५ एवढे अर्ज सादर केले आहेत. यात सर्वाधिक मागणी बी.कॉमला आहे. बी.कॉम प्रवेशात १.८८ लाख विद्यार्थ्यांनी रस दाखविला आहे. त्याचबरोबर, बी.कॉम (अकाउंट अँड फायनान्स), बीएस्सी आयटी, बीएस्सी कम्प्युटर सायन्स, बीकॉम (मॅनेजमेंट स्टडिज) या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती लाभली आहे. (B. Com)

(हेही वाचा – Western Railwayची भन्नाट आयडिया! आता इंडिकेटर शोधण्याची गरज नाही)

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ (Academic year 2024-2025) साठी ३ आणि ४ वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या अभ्यासक्रमांकरिता १३ जूनला संध्याकाळी ५ वाजता पहिली गुणवत्ता यादी संबंधित महाविद्यालयांद्वारे जाहीर केली जाणार आहे. २५ मे पासून ही प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी सुरू आहे. विद्यापीठाने केलेल्या वेळापत्रकानुसार व प्रचलित नियमानुसार ही प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयांमार्फत राबवली जाणार आहे.  (B. Com )

सर्वाधिक मागणीचे अभ्यासक्रम (अर्जांनुसार)

बी.कॉम    १,८८,३९०

बीकॉम (मॅनेजमेंट स्टडिज)    ४१,०५१

बीकॉम (अकाउंट अँड फायनान्स)     १,११,८१२

बीए     ६०,८२६

बीएस्सी आयटी     १,०४,९८४

बीएस्सी     ४१,२९२

बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स     ६६,१८७

बीएएमएमसी (स्वायत्त)     २५,६४०

बीकॉम (बँकिंग अँड इन्शुरंस) (स्वायत्त)     १२,९५२

बी.कॉम (फायनान्शिअल मार्केट) (स्वायत्त)     २५,१२३ 

बी.एस्सी (बायोटेक्नोलॉजी) (स्वायत्त)     १८,९५३

बॅचरल ऑफ मॅनेजमेंट स्टडिज (ई-कॉमर्स) (स्वायत्त)     १४,८६१  

शाखानिहाय अर्ज

विद्याशाखानिहाय सादर केलेल्या प्रवेश अर्जांमध्ये सर्वाधिक वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेसाठी ४,७५,०७९ एवढे अर्ज असून, विज्ञान विद्याशाखेसाठी २,९२,६०० अर्ज, मानव्यविज्ञान शाखेसाठी १,०२,८२५ एवढे अर्ज सादर करण्यात आले आहेत. 

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.