NEET परीक्षेत कुठलाही घोटाळा नाही, Dharmendra Pradhan यांनी फेटाळले आरोप

191
NEET परीक्षेत कुठलाही घोटाळा नाही, Dharmendra Pradhan यांनी फेटाळले आरोप
NEET परीक्षेत कुठलाही घोटाळा नाही, Dharmendra Pradhan यांनी फेटाळले आरोप

NEET-UG मध्ये पेपर लीक झाल्याचा कोणताही पुरावा नाही. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) अतिशय विश्वासार्ह संस्था आहे, त्यात भ्रष्टाचाराचे आरोप निराधार आहेत, असे स्पष्टीकरण नवनिर्वाचित केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG मधील पेपर लीक झाल्याचे आरोप होत आहेत. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला बरेच घेरले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी या प्रकरणातील घोटाळ्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.

(हेही वाचा – Ashadhi Wari 2024: विठूरायांच्या भक्तांसाठी खुशखबर! आषाढीसाठी लालपरीच्या ५००० बस धावणार)

NTA ने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाला सांगितले की, NEET UG 2024 मध्ये ग्रेस गुण मिळालेल्या 1563 उमेदवारांचे स्कोअर कार्ड रद्द केले जातील. त्या उमेदवारांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल. या उमेदवारांच्या निकालांचे पुनरावलोकन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचेही नुकसान होऊ देणार नाही

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, ‘प्रत्येक परीक्षा केंद्रावर पेपरचे दोन संच असतात आणि परीक्षा सुरू होण्याच्या काही वेळापूर्वीच कोणता पेपर उघडायचा आहे, हे सांगितले जाते. सहा परीक्षा केंद्रांवर दुसरा सेट उघडण्यात आल्याने 30 ते 40 मिनिटे वेळ वाया गेला. नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या 2018 च्या निकालानुसार एनटीएने विद्यार्थ्यांना ग्रेस गुण दिले होते. सध्या कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. कोर्ट जो निर्णय घेईल, त्याचे आम्ही पालन करू आणि विद्यार्थ्यांचेही नुकसान होऊ देणार नाही. दोषींना योग्य शिक्षा होईल.’

पुन्हा परीक्षा होणार परीक्षा

दरम्यान, या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने 23 जून रोजी पुन्हा परीक्षा होणार असल्याचे सांगितले आहे. 1563 विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होईल आणि त्यांचे सध्याचे गुण रद्द केले जातील. या परीक्षेचा निकाल 30 जून रोजी जाहीर होणार असून, एनटीएला (NEET) पुन्हा गुणवत्ता यादी तयार करावी लागेल.6 जुलैपासून अॅडमिशन प्रोसेस सुरू होईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.