जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Pune University) औषधी वनस्पती उद्यानात दुर्मिळ वनस्पतींची लागवड करण्यात आली. (Pune University)
राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय, वनस्पतिशास्त्र विभाग आणि पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह-सुविधा केंद्र यांच्यामार्फत औषधी वृक्षांचे रोपण, औषधी वनस्पती रोपे वाटप, विद्यार्थी व नागरिकांना मार्गदर्शन, अश्वगंधा रोपे वाटप, शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवड आदी उपक्रम घेण्यात आले. (Pune University)
(हेही वाचा – Ind vs Qatar Football : कतारला बहाल केलेल्या वादग्रस्त गोलविरोधात भारताची फिफाकडे दाद)
‘या’ वृक्षांचे केले रोपण
कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते कडूकवठ, अंकोल, काकड, काजरा, धावडा, रोहितक, जमालगोटा, रिठा, नोनी, जंगली जांभूळ, फणस, लक्ष्मीतरु, मोह, टेटू, बकुळ, शमी अशा दुर्मिळ वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. विजय खरे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. चारुशीला गायके, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर आदी उपस्थित होते. (Pune University)
केंद्राचे विभागीय संचालक प्रा. दिगंबर मोकाट यांनी प्रास्ताविक केले. वनस्पतीशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. प्रा. ए. बी. नदाफ यांनी मार्गदर्शन केले. कुलगुरूंच्या हस्ते ‘एक वृक्ष निरोगी आरोग्यासाठी, संपन्न देशासाठी, शाश्वत विकासासाठी’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन, शाश्वत विकास, कार्बन क्रेडिट व पर्यावरणासाठीचे कायदे या विषयांवर सुविधा केंद्रात तज्ज्ञांनी चर्चा केली. (Pune University)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community