राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आमचे मायबाप, काय म्हणाले Chandrakant Patil…

240
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आमचे मायबाप, काय म्हणाले Chandrakant Patil…

संघाचे मुखपत्र असलेल्या ‘द ऑर्गनायझर’ (The Organizer) मधून भाजपाला खडेबोल सुनावण्यात आले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांची साथ घेतल्यामुळे राज्यात भाजपाचे (BJP) नुकसान झाल्याचे त्यात म्हटले आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) राजकीय पक्षांनी मर्यादा पाळल्या नाहीत, असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी भाजपावर निशाणा साधला. यावरून भाजप आणि आरएसएसमध्ये मिठाचा खडा पडला का? अशी चर्चा रंगू लागली आहे. आता यावर भाजपा नेते तथा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Chandrakant Patil)

चंद्रकांत पाटील म्हणाले की, आरएसएसने काहीही टीका केलेली नाही. आरएसएसमधून प्रेरणा घेणारे आम्ही आहोत. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS Sangh) हे आमचे माय बाप आहेत. मुलांचे चुकले तर आई-वडिलांनी सांगायचं असतं. आई-वडिलांना सांगण्याचा अधिकार असतो. मुलांनीही त्यांच्यातील जे योग्य आहे ते करेक्शन कारायचं असतं.” आम्ही अशा आई-वडिलांची मुलं नाही आहोत जे उद्धटपणे आई-वडिलांना म्हणू की तुम्हाला काय कळतंय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

(हेही वाचा – Monsoon in Mumbai 2024 : मुंबईत बदलतोय मान्सूनचा पॅटर्न; काय म्हणतात हवामान तज्ज्ञ)

मोहन भागवतांनीही टोचले होते कान

ऑर्गनायझरमधून अजित पवार यांची साथ घेतल्यामुळे राज्यात भाजपाचे नुकसान झाल्याचे त्यात म्हटले आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी मर्यादा पाळल्या नाहीत, असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपावर निशाणा साधला. यावरून भाजप आणि आरएसएसमध्ये मिठाचा खडा पडला का? अशी चर्चा रंगू लागली आहे.

(हेही वाचा – Congress Internal Conflict : काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर)

पुण्यात भाजपच्या बैठकांवर बैठका

पुणे शहरातील एक जागा सोडली तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी भाजपाला म्हणावं तसं यश मिळाले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जागांवर महायुतीतील घटकपक्षांचा पराभव झाला. त्यामुळे आज भाजपा पदाधिकाऱ्यांच्या पुण्यात बैठका पार पडल्या. या बैठकीमध्ये पराभवाच्या कारणांची दखल घेण्यात आली. तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कशापद्धतीने सामना देता येईल, यावर देखील चिंतन करण्यात आले. (Chandrakant Patil)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.