World Blood Donor Day साजरा करण्यामागचं कारण आहे तरी काय?

131
World Blood Donor Day साजरा करण्यामागचं कारण आहे तरी काय?
World Blood Donor Day साजरा करण्यामागचं कारण आहे तरी काय?

जागतिक रक्तदाता दिवस (World Blood Donor Day) दरवर्षी १४ जून रोजी साजरा केला जातो. रक्तदानाच्या महत्वाबद्दल लोकांना सांगणे आणि रक्तदानातून जीव वाचवणाऱ्या स्वयंसेवकांचा सन्मान करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. हा दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे या दिवशी शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टेनर यांनी रक्तगट प्रणालीचा शोध लावला. त्यांच्या योगदानाबद्दल, कार्ल लँडस्टीनर यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले. (World Blood Donor Day)

(हेही वाचा- Supreme Court च्या विशेष लोक अदालतीत सहभागी होण्याचे आवाहन)

जागतिक रक्तदाता दिन (World Blood Donor Day)२००४ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सुरु केला आणि तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी अनेक राष्ट्रांमध्ये विशेष कार्यक्रम आणि जागरुकता कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी लोकांना रक्तदानाच्या फायद्यांबद्दल शिक्षित केले जाते. तसेच रक्तदानाबद्दलचे समज आणि गैरसमज दूर करण्यात देखील मदत होते. (World Blood Donor Day)

रक्तदान कोण करु शकतं?

निरोगी असलेली कोणतीही व्यक्ती, ज्या व्यक्तीला जुनाट आजार नाही, ती रक्तदान करू शकते. निरोगी लोकांनी वर्षातून एकदा रक्त तपासणी करावी. नियमित आरोग्य तपासणी करून शरीराची स्थिती आणि त्यात होत असलेल्या बदलांची माहिती मिळवून तुम्ही रक्तदान करण्यासाठी पात्र ठरु शकता. (World Blood Donor Day)

(हेही वाचा- Pune University मधील औषधी वनस्पती उद्यानात दुर्मिळ वनस्पतींची लागवड)

रक्तदान का करावे?

रक्तदान केल्यामुळे तुम्ही केवळ इतरांना जीवनदान देत नसता तर हे तुमच्यासाठी देखील फायदेशीर ठरु शकते. रक्तदान केल्याने तुमच्या शरीरात नव्या रक्ताची निर्मिती होत असते. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. तसेच
रक्तदान करून तुम्ही लोकांचे प्राण वाचवू शकता. एखाद्याच्या शरीरात रक्ताची कमतरता असल्यास किंवा अपघातानंतर शरीरातून जास्त रक्तस्त्राव होत असल्यास रक्तदान करावे. असे केल्याने तुम्ही देवदूत ठरता. (World Blood Donor Day)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.