जर्मन टेनिसपटू Stefanie Maria Graf

Stefanie Maria Graf : १९६८ साली ओपन एरा सुरू झाल्यापासून महिला एकेरीमधले सर्वात जास्त दुसरे विजेतेपद स्टेफनी ग्राफकडे आहे.

400
जर्मन टेनिसपटू Stefanie Maria Graf
जर्मन टेनिसपटू Stefanie Maria Graf

स्टेफनी मारिया ग्राफ (Stefanie Maria Graf) ही एक जर्मन माजी प्रोफेशनल टेनिसपटू आहे. तिच्या कारकिर्दीत तिने २२ मोठे विजेतेपद मिळवले आहेत. १९६८ साली ओपन एरा सुरू झाल्यापासून महिला एकेरीमधले सर्वात जास्त दुसरे विजेतेपद स्टेफनी ग्राफकडे आहे. तसेच ती ऑल टाईम स्पर्धांमध्ये सर्वांत जास्त वेळा तिसरी येणारी महिला आहे. १९८८ साली एकाच वर्षामध्ये चारही प्रमुख एकेरी फेऱ्यांमध्ये विजेतेपद मिळवणारी आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून गोल्डन स्लॅम मिळवणारी स्टेफनी ग्राफ ही पहिली तसेच एकमेव टेनिसपटू ठरली. (Stefanie Maria Graf)

(हेही वाचा- Pune-Nashik Expressway ला तूर्तास स्थगिती; फेरविचार करण्याच्या सूचना)

वूमन्स टेनिस असोसिएशन म्हणजेच WTA ने स्टेफनी ग्राफला ३७७ आठवडे एकेरी क्रमवारी स्पर्धांमध्ये जागतिक पातळीवर पहिल्या स्थानावर ठेवलं होतं. स्टेफनी मारिया ग्राफ हिने तिच्या कारकिर्दीत १०७ एकेरी विजेतेपदाचे किताब जिंकले होते. त्यानंतर WTA च्या सर्वकालीन क्रमांकाच्या यादीमध्ये ती तिसऱ्या स्थानावर राहिली. (Stefanie Maria Graf)

सर्व प्रकारच्या मैदानांवर अष्टपैलू खेळी, तिचं फुटवर्क आणि स्ट्रॉंग फॉरहँड ड्राईव्ह ही स्टेफनी ग्राफच्या खेळाची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत. स्टेफनी ग्राफची खेळण्याची क्षमता आणि तिची बेसलाईन वरून खेळणारी आक्रमक खेळी लाजवाब आहे. त्यासोबतच आधुनिक खेळाची शैली विकसित करण्याचं श्रेयही स्टेफनीला दिलं जातं. तिची आधुनिक खेळाची शैली ही आजच्या टेनिस खेळाडूंना प्रेरणा देत आहे. (Stefanie Maria Graf)

(हेही वाचा- मुंबई Teacher Graduate Constituency मध्ये 359737 मतदारांची नोंदणी)

सहा फ्रेंच ओपन एकेरी, सात विम्बल्डन एकेरी, चार ऑस्ट्रेलियन ओपन आणि पाच युएस ओपन एकेरी विजेतेपदे तिने पटकावले आहेत. स्टेफनी मारिया ग्राफ ही १९९९ साली वयाच्या ३० व्या वर्षी निवृत्त झाली. ती जागतिक सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडूंच्या क्रमवारीत ३ऱ्या क्रमांकावर होती. मार्टिना नवरातिलोव्हाने स्टेफनी ग्राफला तिच्या आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत शीर्षस्थानी ठेवले आहे. (Stefanie Maria Graf)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.