जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (PM Modi Jammu Kashmir Visit ) सध्या राज्यात सर्वत्र सैन्याच्या शोध मोहिमा सुरू असून, चार दहशतवाद्यी ठार झाले आहेत. अशातच, तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी येत्या 20 जून रोजी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 21 जून रोजी राज्यात होणाऱ्या योग दिनाच्या (yoga day) कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी होतील. (PM Modi Jammu Kashmir Visit )
यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस
यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस, योग महोत्सव 2024 म्हणून साजरा केला जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान मोदी 20 जून रोजी काश्मीरला पोहोचतील आणि तिथे रात्री मुक्काम करतील. दुसऱ्या दिवशी सकाळी एका योग कार्यक्रमात ते सहभागी होतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाची जागा अद्याप निश्चित झाली नसले तरी, हा कार्यक्रम श्रीनगरमधील दल सरोवर आणि झाबरवान टेकड्या परिसरात आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. अशा वातावरणात मोदींनी जम्मू-काश्मीरला जाणे, दहशतवाद्यांसाठी थेट इशारा असेल. (PM Modi Jammu Kashmir Visit )
जम्मू-काश्मीर प्रशासन हाय अलर्ट वर
लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील जम्मू-काश्मीर प्रशासनाला पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबत हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. याचबरोबर जम्मू-काश्मीर स्पोर्ट्स काउंसिलला योग दिनाच्या कार्यक्रमाच्या व्यवस्थेवर देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा पथके नियमितपणे आयोजनस्थळी दौरे करतील. (PM Modi Jammu Kashmir Visit )
हेही पहा –
Join Our WhatsApp Community