राज्यातील बहुचर्चित तब्बल 25 हजार कोटी रुपयांच्या शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि इतर आरोपी अडचणीत आले होते; पण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना (इओडब्ल्यू) दिलासा दिला होता. या घोटाळ्याप्रकरणी कोणतेच पुरावे नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व दोषींना दिलासा देण्यात आला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवार यांच्यासह सुनेत्रा पवार यांना देखील या प्रकरणी दिलासा देण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी जानेवारी महिन्यात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता.
(हेही वाचा – anuskura ghat land slide: अणुस्कुरा घाटात दरड कोसळली; कोकणात जाणारी वाहतुक ठप्प)
कोर्टात घेतली धाव
याच शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या (Shikhar Bank Scam) अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) आव्हान देणार आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांना दिलेल्या क्लीन चिटला अण्णा हजारे विरोध करणार आहेत. त्यासंदर्भात त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतला आहे.
न्यायालयाने हा आक्षेप मान्य करत निषेध याचिका दाखल करण्यास अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांना वेळ दिला आहे. 29 जूनला पुढची सुनावणी होणार आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवार आणि इतरांना क्लीन चिट दिली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने दिला होता दिलासा
बँकेच्या (Shikhar Bank Scam) कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्रीत अनियमितता असल्याचे आरोप अजित पवार आणि इतर आरोपींवर करण्यात आले होते. क्लोजर रिपोर्ट सादर करतांना कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्रीसंबंधी बँकेला नुकसान झाल्याचे कोणतेच पुरावे नसल्याचं आर्थिक गुन्हे शाखेने म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार यांना दिलासा देण्यात आला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community