T20 World Cup, Ind vs Canada : भारताच्या कॅनडा विरुद्धच्या सामन्यावर वादळाचं सावट

T20 World Cup, Ind vs Canada : मियामीमध्ये वादळाचा अंदाज असल्यामुळे भारतीय संघ रविवारच्या सामन्यासाठी सरावही करू शकणार नाहीए 

141
T20 World Cup, Ind vs Canada : भारताच्या कॅनडा विरुद्धच्या सामन्यावर वादळाचं सावट
T20 World Cup, Ind vs Canada : भारताच्या कॅनडा विरुद्धच्या सामन्यावर वादळाचं सावट
  • ऋजुता लुकतुके

भारताचे न्यूयॉर्कमधील सामने आता संपले आहेत. भारताने तीनही सामने जिंकले असले तरी नसॉ काऊंटी क्रिकेट स्टेडिअम कमी धावसंख्येमुळे आणि तिथल्या अनियमित उसळीमुळे सगळ्यांच्या लक्षात राहील. भारतीय संघ आता चौथ्या साखळी सामन्यासाठी मियामीला पोहोचला आहे. तिथे लाऊडरहिलला रविवारचा सामना कॅनडाविरुद्ध होणार आहे. पण, या सामन्यावर वादळाचं सावट आहे. मियामीत चक्रीवादळाचा अंदाज आहे. तिथे जाणारी विमानं रद्द व्हायलाही सुरुवात झाली आहे. (T20 World Cup, Ind vs Canada)

(हेही वाचा- G7 summit: इटलीतील G7 मध्ये भारताचा ठसा उमटला; परदेशातील सर्वांचे नमस्तेने स्वागत)

त्यामुळे रविवारचा हा सामना होण्याची शक्यता तशी कमीच आहे. फक्त हा सामनाच नाही, तर मधले दोन दिवस भारतीय संघ मियामीत सराव करू शकेल अशीही शक्यता कमीच आहे. सामन्यापेक्षा सराव न करण्याची काळजी भारतीय संघ प्रशासनाला वाटतेय. भारतीय संघाचा वेस्ट इंडिजमधील पहिला सामना २० जूनला होणार आहे. सुपर ८ मधील प्रत्येक सामना हा भारतासाठी महत्त्वाचाच असेल. भारताचे सुपर ८ मधील बहुतेक सर्व प्रतिस्पर्धी हे आधीपासून वेस्ट इंडिजमध्ये खेळत असल्याचा फायदा त्यांना मिळणार आहे. भारताच्या गटात ऑस्ट्रेलिया (Australia), अफगाणिस्तान (Afghanistan), इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड हे संघ असू शकतात. (T20 World Cup, Ind vs Canada)

 ‘भारतीय संघ विश्वचषकानंतर वेस्ट इंडिजला खेळलेला आहे. त्याचा फायदा संघाला नक्की मिळेल. तिथलं वातावरण खेळाडूंना नवीन नाही. भारतातही मुंबईची खेळपट्टी कोलकाता आणि अहमदाबादपेक्षा वेगळी असते, तसंच हे आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज वेगळेच असणार. पण, त्याची काळजी करण्याची गरज नाही,’ असं भारताचे गोलंदाजीचे प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.  (T20 World Cup, Ind vs Canada)

(हेही वाचा- anuskura ghat land slide: अणुस्कुरा घाटात दरड कोसळली; कोकणात जाणारी वाहतुक ठप्प)

त्याचबरोबर अमेरिकेत तेज गोलंदाजांची चलती होती. आता फिरकीपटूंना संघात संधी मिळू शकते, असं सुतोवाचही त्यांनी केलं. आणि त्यासाठी संघाची पहिली पसंती कुलदीपला असेल असंही त्यांनी सुचवलं आहे. (T20 World Cup, Ind vs Canada)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.