- ऋजुता लुकतुके
ज्या क्रिकेट मैदानावर इतके दिवस भारतीय संघ आपले टी-२० विश्वचषकाचे (T20 World Cup, Nassau County Cricket Stadium) सामने खेळत होता, त्या मैदानाबाहेर शुक्रवारी अमेरिकन प्रमाण वेळेनुसार, सकाळी साडे आठ वाजता बुलडोझर रांगेनं उभे होते. न्यूयॉर्कचं नसॉ काऊंटी क्रिकेट स्टेडिअम (T20 World Cup, Nassau County Cricket Stadium) हे अमेरिकेतील ३ ठिकाणांपैकी एक होतं. डॅलस, लाऊडरडेल (Lauderdale) आणि न्यूयॉर्कच्या (New York) या मैदानावर टी-२० विश्वचषकाचे सामने होत होते. आता न्यूयॉर्कमधील टप्पा संपल्यावर हे मैदान पाडण्यात आलं आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी हे मैदान तात्पुरत्या स्वरुपात तयार करण्यात आलं होतं. ३४,००० प्रेक्षकांची व्यवस्था इथं झाली. एरवी ही जागा खुल्या मैदानाची आहे. (T20 World Cup, Nassau County Cricket Stadium)
(हेही वाचा- आधी प्रभु रामचंद्रांची भक्ती, नंतर अहंकार आला; RSS नेते Indresh Kumar म्हणाले…)
बुधवारी इथं झालेला अमेरिका विरुद्ध भारत हा सामना इथला शेवटचा सामना होता. त्यानंतर १२ बुलडोझरनी मिळून हे स्टेडिअम जमीनदोस्त केलं.
#WATCH | Nassau County, New York (USA): Bulldozers placed at the Nassau Cricket Stadium as the temporary stadium is set to be dismantled from tomorrow.
The T20 World Cup match between India and the US yesterday was played here. pic.twitter.com/iYsgaEOWlP
— ANI (@ANI) June 13, 2024
या विश्वचषकातील १६ सामने अमेरिकेत होणार आहेत. भारत विरुद्ध अमेरिका सामना संपल्यानंतर लगेचच इथं आवराआवरीला सुरुवात झाली होती. आतील सामान हलवण्याची तयारी सुरू झाली होती. इथं उभ्या केलेल्या प्रेक्षकांच्या गॅलरीही तात्पुरत्या होत्या. आता त्या पाडण्यात आल्या आहेत. तर इथली खेळपट्टी बाहेर तयार करून नंतर इथं बसवण्यात आली होती. (T20 World Cup, Nassau County Cricket Stadium)
And so the dismantling begins at Eisenhower Park. Adios Nassau County International Cricket Stadium. We hardly knew ye! pic.twitter.com/vL3bN7M4JY
— Peter Della Penna (@PeterDellaPenna) June 12, 2024
न्यूयॉर्कच्या नसॉ काऊंटीतील आयसेन हॉवर पार्कमध्ये १०६ दिवसांत हे स्टेडिअम उभारण्यात आलं होतं. आता ते इथून हटवण्यासाठी ६ आठवडे लागणार आहेत. न्यूयॉर्क खेरिज डॅलस आणि लाऊडरडेल या आणखी दोन अमेरिकन शहरांत विश्वचषकाचे सामने होणार आहेत. येत्या रविवारनंतर स्पर्धेचा सुपर ८ टप्पा हा वेस्ट इंडिजमध्ये होईल. २९ तारखेला स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. (T20 World Cup, Nassau County Cricket Stadium)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community