शरद पवार (Sharad Pawar) गटाचे अहमदनगरचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी कुख्यात गुंड गजा मारणे (Gajanan Marne) याची भेट घेतली. निलेश लंके सध्या पुणे दौऱ्यावर आहेत, त्यांनी गुरुवारी (१३ जून) गजा मारणे याची भेट घेतली. लंकेंची ही भेट वादात पडण्याची शक्यता आहे. गजा मारणेने निलेश लंकेंचा सत्कार केला. निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. यामुळे यावरुन आता राजकीय वाद रंगण्याची शक्याता आहे. (Gajanan Marne)
गजा मारणे कोण आहे?
गजानन मारणेचं मुळ गाव मुळशी तालुक्यात आहे. कुख्यात गुंड गजानन मारणे (Gajanan Marne) उर्फ गजा मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये गजा मारणे याला अटक झाली होती. या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला शिक्षाही दिली होती. त्यानंतर गजा मारणे तीन वर्ष पुण्यातील येरवडा कारगृहात होता. मारणे आणि मोहोळ टोळीचा पुण्यात दबदबा आहे. (Gajanan Marne)
यापूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारणेची (Gajanan Marne) भेट घेतली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार याला फटकारले होते, असे अजिबात घडता काम नये, असे बजावले होते. अहमदनगर लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांना निलेश लंके यांनी पराभूत केले होते. या निवडणुकीत निलेश लंके यांना 6 लाख 24 हजार 797 मते मिळाली. सुजय विखे यांना 5 लाख 95 हजार 868 मते मिळाली होती. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत 28 हजार 929 मतांनी निलेश लंके यांचा विजय झाला. (Gajanan Marne)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community