खुशखबर! केरळमध्ये २४ तासांत पावसाचे आगमन!

रविवारी मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांना पावसाचा आनंद घेता येणार.

121

यंदाच्या वर्षी मान्सून हा वेळेआधीच दाखल होणार आहे, असे हवामान खात्याने सांगितले होते, त्याप्रमाणेच पावसाचे महाराष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण सुरु आहे. येत्या २४ तासांत तो केरळात दाखल झाल्यावर येणारा रविवार मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांना पावसाचा आनंद घेता येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी पावसाळ्याच्या आगमनाची तयारी करावी.

राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धमाकूळ!

सध्या अरबी समुद्रात मान्सूनच्या आगमनासाठी पोषक हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत केरळात मान्सून दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल बदल होऊन केरळात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. दुसरीकडे, महाराष्ट्राला मात्र मागील काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. आजही राज्यात पूर्व मोसमी पावसाने झोडपले आहे. दुपारपासून पालघर, रायगड, पुणे, सातारा, अहमदनगर, रत्नागिरी, जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद लातूर आणि विदर्भात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणाची नोंद झाली, संध्याकाळी या ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडला.

(हेही वाचा : ‘तो’ इंडियन व्हेरिएंट नाहीच… काय आहे WHOचे म्हणणे?)

यंदा १०१ टक्के पाऊस! 

पावसाचा दुसरा सुधारित अंदाज हवामान खात्याने मंगळवारी जारी केला. यानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात सरासरी १०१ टक्के पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या नवीन सुधारित अंदाजानुसार, यंदा कोकणात सर्वाधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.