Champions Trophy 2025 : पाकिस्तानने सादर केलं चॅम्पियन्स करंडकाचं संभाव्य वेळापत्रक, भारताचे सामने दुसरीकडे भरवण्याला नकार

Champions Trophy 2025 : पाकिस्तानने भारताचे सामने एकाच शहरात खेळवायची तयारी मात्र दाखवली आहे.

198
Champions Trophy 2025 : पाक क्रिकेट मंडळाने हायब्रीड मॉडेलचा पर्याय नाकारला?
  • ऋजुता लुकतुके

२०२५ च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचा यजमान देश असलेल्या पाकिस्तानने अखेर आयसीसीला स्पर्धेचा अंतिम प्रस्ताव सादर केला आहे. यात स्पर्धा १९ फेब्रुवारीला सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. तसंच भारताचे सामने इतर देशांत आयोजित करण्याला त्यांनी नकार दिला आहे. स्पर्धा पूर्णपणे पाकिस्तानमध्ये व्हावी अशी त्यांची भूमिका आहे. २०२३ च्या आशिया चषकात भारताचे सामने श्रीलंकेत पार पडले होते. (Champions Trophy 2025)

आयसीसीला सादर केलेल्या प्रस्तावानुसार, स्पर्धा १९ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२५ दरम्यान पार पडायची आहे. कराची, रावळपिंडी आणि लाहोर या शहरांत सामने भरवण्यात येतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एका पथकाने अलीकडेच पाकिस्तानचा दौरा करून स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला आहे. पाक क्रिकेट मंडळातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या पथकाचा अहवाल सकारात्मक आहे. यावेळी भारताच्या बाबतीत मात्र पाकिस्तानने कडक भूमिका घेतलेली दिसतेय. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा – T20 World Cup, Ind vs Canada : ‘दोनच तेज गोलंदाज खेळवायचे असतील तर सिराजला बसवा, अर्शदीपला खेळवा,’ – अनिल कुंबळे)

भारतीय संघाने पाकिस्तानमध्येच खेळावं असा त्यांचा आग्रह आहे. तर बीसीसीआयने (BCCI) आशिया चषकाप्रमाणेच भारतीय संघाचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याची विनंती केली आहे. पाक मंडळाने भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळवण्याची तयारी दर्शवली आहे. लाहोर शहर भारत-पाक दरम्यानच्या वाघा सीमेपासून जवळ आहे. त्यामुळे सुरक्षेवर धोका निर्माण झाला तर भारत गाठणंही संघासाठी सोपं असेल असं पाकिस्तानला वाटतं. (Champions Trophy 2025)

आता भारत या प्रस्तावावर काय भूमिका घेतो हे पहावं लागणार आहे. भारतीय नागरिकांना पाकिस्तानमध्ये जायचं असेल तर केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. शिवाय पाकिस्तानमध्ये खेळण्याची सक्ती बीसीसीआय (BCCI) भारतीय खेळाडूंवर करु शकेल का, हे ही पाहावं लागेल. २००८ पासून भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेला नाही. अलीकडे डेव्हिस चषक टेनिसचे सामने मात्र पाकिस्तानमध्ये झाले होते आणि भारतीय टेनिस संघाने पाकचा दौरा केला. पण, तो २ दिवसांसाठी होता. इथं किमान पंधरा दिवसांचा प्रश्न आहे. (Champions Trophy 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.