Vegetable Prices high; भाज्यांचे भाव कडाडले… फरसबी, वाटाणासह दोडका १६० रुपये किलो!

108
Vegetable Prices high; भाज्यांचे भाव कडाडले... फरसबी, वाटाणासह दोडका १६० रुपये किलो!

राज्यात पावसाचे आगमन झाले असले तरी, भाजीपाल्याचा दुष्काळ अद्याप संपल्याचे दिसत नाहीये.  उत्पादनच कमी होत असल्यामुळे मुंबई बाजार समितीमध्येही (Mumbai Market Committee) तुटवडा निर्माण झाला असून, बाजारभाव दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये फरसबी, वाटाणा, दोडक्याचे दर १६० रुपये किलोवर पोहोचले आहेत. इतर अनेक भाज्यांनीही शंभरी ओलांडली असून, पुढील एक महिना तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. (Vegetable Prices high)  

कोथिंबिरीची आवक वाढली

गुरुवारी कोथिंबिरीची आवक १ लाख ८५ हजार जुड्यांवर पोहोचली होती. यामुळे होलसेलमध्ये बाजारभाव २० ते ६० वरून २० ते ३० रुपयांवर आले आहेत. पालकच्याही १ लाख ४४ हजार जुडी विक्रीसाठी आल्या असून, इतर पालेभाज्यांची आवक अद्याप कमीच आहे. पाऊस प्रमाणात पडला तर पुढील एक महिन्यात भाजीपाल्याचे उत्पादन वाढून दर नियंत्रणात येतील. परंतु, पाऊस मुसळधार कोसळला तर पुन्हा उत्पादनावर परिणाम होऊन भाजीपाल्याचे दर तेजीतच राहण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Rahul Gandhi रायबरेली सोडणार की वायनाड? निर्णय झाला; उमेदवारही निश्चित)

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Bombay Agricultural Produce Market Committee) गुरुवारी ४८३ ट्रक, टेम्पोमधून २२४२ टन भाजीपाल्याची आवक झाली असून, यामध्ये ४ लाख ६० हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. गाजर १३५ टन, कोबी १६९ टन व टोमॅटोची १८३ टन आवक झाली आहे. या तीन भाज्या वगळता इतर सर्वच भाज्यांची आवक प्रचंड घसरली आहे. फरसबीची आवक फक्त आठ टन झाली आहे. बाजार समितीमध्ये १०० ते १२० व किरकोळ मार्केटमध्ये १४० ते १६० रुपये किलो दराने फरसबी विकली जात आहे. वाटाण्याची आवकही ८३ टन झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये वाटाणा १०० ते १२० व किरकोळ मार्केटमध्ये १६० रुपये किलो दराने विकला जात आहे. (Vegetable Prices high)

बाजार समिती व किरकोळ मार्केटमधील प्रतिकिलो भाव

वस्तू – होलसेल – किरकोळ
कांदा – २१ ते २९ – ४०
फरसबी – १०० ते १२० – १४० ते १६०
वाटाणा १०० ते १२० – १४० ते १६्०
भुईमूग शेंगा – ६० ते ९० – ८० ते १००
भेंडी ५५ ते ७० – ८० ते १००
गवार – ७५ ते ८५ – १२० ते १४०
घेवडा ७५ ते ८५ – १४० ते १६०
ढोबळी मिरची ५० ते ६० – ८० ते १००
शेवगा शेंग ६० ते ८० – १०० ते १२०

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.